लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत असलेल्या एका ५५ वर्षिय महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने महिला गंभीर ज खमी झाली आहे. ही घटना तालुक्यातील बोरगाव काकडे येथे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.बोरगाव काकडे येथील वडाचा माळ शिवारात सोयाबीन सोंगणीसाठी गेलेल्या लक्ष्मी भास्कर दहीभाते वय ५५ वष्रे यय़ा आपल्या स्वत:च्या शेतातील कामात व्यस्त असताना अचानक पणे अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला. दरम्यान, लक्ष्मी दहीभाते यांच्यासमवेत असलेला त्यांचा मुलगा हनुमान दहिभाते व इतर मजुरांनी आरडाओरड करीत त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली व सदर अस्वलाला हुसकावून लावले; मात्र यामध्ये लक्ष्मी दहीभाते या गंभीर झाल्याने त्यांना तातडीने चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथील प्रा थमिक उपचारानंतर त्यांना बुलडाणा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत अमडापूर पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेऊन घटनास्थळी गावकर्यांसह अस्वलाचा शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. तर यापूर्वीही अस्वलाच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये बळीदेखील गेले असल्याने वन विभागाने याबाबत गंभीरतेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात बोरगाव येथील महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:14 IST
चिखली : शेतातील सोयाबीनची सोंगणी करीत असलेल्या एका ५५ वर्षिय महिलेवर अस्वलाने हल्ला केल्याने महिला गंभीर ज खमी झाली आहे. ही घटना तालुक्यातील बोरगाव काकडे येथे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
अस्वलाच्या हल्ल्यात बोरगाव येथील महिला जखमी
ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरणवन विभागाचे दुर्लक्ष