बुलडाणा: कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ व इतर समस्यांनी ग्रस्त तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरावर स्वयंसेवी संस्थांद्वारा समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे; मात्र जिल्ह्यात १४ पैकी १0 केंद्र सुरू असून, जे केंद्र सुरू आहेत त्यातील अनेक केंद्रांना केवळ खिरापत वाटल्यासारखे निधीचे वाटप केल्या गेले आहे.महिला बालकल्याण विभागाच्या सेस फंडातून या केंद्रांना १0 टक्के अनुदान दिल्या जाते; परंतु अनेक केंद्रांची सध्याची अवस्था तसेच निवाडे झालेली प्रकरणे पाहिल्यास ही केंद्र कागदोपत्रीच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, शेगाव, जळगाव जामोद, लोणार आणि मेहकर या दहा तालुक्यात सध्या समुपदेशन केंद्र सुरू आहेत. जि.प.च्या त्रिसदस्यीय समितीमार्फत या केंद्रांची निवड करण्यात येते. या केंद्राबाबत जिल्हा समन्वयकांकडून नियमित अहवाल घ्यावा लागतो.; मात्र अनेक केंद्रांची अवस्था पाहता सर्वच अहवाल कसे योग्य दिल्या जातात, याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जाते. जिल्ह्यात १४ केंद्रांची निवड करण्यात आली होती. यापैकी चार केंद्र बंद अवस्थेत आहे. यासंदर्भात महिला बालकल्याण विभागाने राजेंद्र लोखंडे त्यांना विचारणा केली असता, या केंद्रांबाबत माहिती घेऊ, जे बंद असतील त्यांच्यावर कारवाई करू, असे सांगितले.
महिला समुपदेशन केंद्र केवळ कागदावर!
By admin | Updated: May 25, 2016 01:54 IST