धामणगाव बढे (जि. बुलडाणा) : बुलडाणा आगाराची महिला वाहक आणि एसटी बसमधून प्रवास करीत असलेल्या महिला प्रवासी यांच्यात मारहाण झाल्याची घटना १0 मे रोजी दुपारी प्रवासादरम्यान घडली. एकमेकींच्या तक्रारीवरून दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धामणगाव बढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा आगाराच्या सावळद बाराच्या नियमित फेरीकरिता निघालेल्या बसमध्ये (एमएच १२ - ७५७0) महिला वाहक व महिला प्रवासी यांच्यात सुट्या पैशांवरून वाद झाला. याबाबत धामणगाव बढे पोलीस ठाण्यात वाहक गीता शेवाळे यांनी तक्रार दिली. सुट्या पैशांवरून प्रवासी हौसाबाई वाकडे, कल्पना वाकडे, उषा वाकडे यांनी वाद घालून आपणास मारहाण केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार शेवाळे यांनी दिली. या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी संबंधित महिलाविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
महिला वाहक व महिला प्रवाशात मारहाण
By admin | Updated: May 11, 2015 02:10 IST