लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मनुष्याच्या जीवनातील सर्वच समस्यांवर एकच रामबाण उपाय आहे. तो उपाय म्हणजे शहाणपण होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेपासूनच शहाणपणाची कास धरावी, असे आवाहन जीवन विद्या मिशनचे सुहास पवार (बारामती) यांनी येथे केले.जीवन विद्या मिशन, मलकापूर शाखेच्यावतीने जळगाव जामोद तालुक्यातील विविध शाळांमध्ये ‘घर तेथे जीवनविद्या’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवार २० जानेवारीला जळगाव जामोद येथील जनता विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात तर मंगळवार २१ जानेवारी रोजी दि न्युरा हायस्कूल मध्ये ‘सदगुरूंचे अनमोल संदेश ’ हा कार्यक्रम झाला. यावेळी बारामती येथील सुहास पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर पुरूषोत्तम टेकाडे, विजय चौधरी यांची उपस्थिती होती. यावेळी जनता विद्यालय, न्युरा विद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील सुमारे दीड विद्यार्थ्यांना ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’, ‘अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा’, ‘जसा विचार तसा जीवनाला आकार’, ‘देतो तो देव’, ‘सावध तो सुखी’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपरोक्त शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सदगुरू वामनराव पै यांच्या अनेक ग्रंथांची मागणी केली.
शहाणपण हा सर्व समस्यांवरील उपाय: सुहास पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:23 IST