शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाईन बार झाले ‘फॅमिली रेस्टॉरंट’!

By admin | Updated: April 5, 2017 23:40 IST

सोनाळा- राज्य महामार्ग क्रमांक १९४ वरील सोनाळा परिसरातील वाईन बार मालकांनी शक्कल लढवित, फलकांवरील ‘वाईन बार’ खोडून त्याठिकाणी ‘फॅमिली रेस्टॉरंट’ असे केले आहे.

वाईन बार मालकांची नवी शक्कल : फलकांवरील वाईन बार खोडून रेस्टॉरंटचे फलकसोनाळा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असणारी मद्य विक्रीमध्ये मोडता येणारे बीअर बार, वाईन बार, बीअर शॉपी पब, देशी-विदेशी दारू आदी मद्य विक्रीची सर्व दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, परिसरातील वाईन बार मालकांनी शक्कल लढवित फलकावरील वाईन बार खोडून रेस्टॉरंट सुरू ठेवले आहेत. सोनाळा परिसरातील १९४ राज्य मार्गावरील असणारे मद्य विक्रीच्या दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २ एप्रिलच्या मध्यरात्री चार वाईन बार व एक देशी दारू दुकानाला सील लावले.सोनाळा-अकोट १९४ राज्य मार्गावर परिसरात चार वाईन बार व एक गावात असे पाच वाईन बार आहेत. यामधील वाईन बार मालकांनी दुकानासमोरील फलकावरील वाईन बार हा शब्द खोडून त्या ठिकाणी फॅमिली रेस्टॉरंट शब्दाची नवी शक्कल लढवून खाणावळ, भोजनालय सुरू केल्याने ग्राहक वर्ग भोजनालयात जाऊन भोजनाचा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे.कायदा कितीही कठोर असला, तरी त्यामध्ये पळवाटा शोधतात, अशी चर्चा परिसरात रंगत आहे. काही फॅमिली रेस्टॉरंटमध्ये व्हेज व नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे भोजन मिळत असून, दारूला परिपूर्ण बंदी असल्याचे बार मालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. काही वाईन बार परिपूर्ण बंद असल्याचे दिसून येत आहेत. वस्तीला लागूनच वाईन बार, देशी दारूचे दुकाने असल्याने वस्तीमधील नागरिकांना दारूड्याचा त्रास, बसस्थानक, शिवाजी वेस, वाल्मीक चौक, सायखेड वेस, पिंगळी वेस आदी परिसरातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. दारूवर बंदी आल्याने थोडाफार दारुड्यांचा धिंगाणा कमी झाला आहे. सोनाळ्यात जादा भावाने दारू विक्रीयेथील देशी दारूचे दुकान बंद असल्याचा फायदा घेत काहींनी अवैधरीत्या दारू विक्री सुरू केली आहे. बावनबीर, जळगाव जामोद येथून दारू खरेदी केल्यानंतर या दारूची जादा भावाने सोनाळा येथे विक्री करण्यात येत आहे. तसेच जादा नफ्यापोटी दारूमध्ये भेसळ करण्यात येत आहे.दारूकरिता बावनबीर रस्त्याने गर्दीबावनबीर येथील देशी दारूचे दुकान शासनाच्या नियमातून बाद झाले आहे. सोनाळा, टुनकी, सायखेड, पिंगळी, सगोडा, बोरखेड, परिसरातील तळीराम दारू मिळण्यासाठी बावनबीर रस्त्याने पहावयास मिळत आहे. सोनाळ्यावरून बावनबीर चार कि.मी. रस्ता असल्याने तळीराम पायवारीने किंवा वाहनाने जाऊन आपली हौस फिटविताना दिसून येत आहेत.