शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाला वाढविण्यासाठी प्रयत्न करणार - सावळे

By admin | Updated: May 1, 2016 01:26 IST

भाजप जिल्हाध्यक्षपदी धृपतराव सावळे.

बुलडाणा : भाजपमध्ये आपले आयुष्य जेमतेम सहा महिन्यांचे आहे. सहा महिन्यांपूर्वी मी पक्षात प्रवेश घे तला. त्यामुळे आपल्यावर जिल्हाध्यक्ष पदासारखी मोठी जबाबदारी येऊन पडेल, असे वाटत नव्हते, पण पक्षाने विश्‍वास टाकला, या विश्‍वासाला तडा न जाऊ देता आपल्या पाठीशी असलेला सामाजिक व राजकीय कार्याचा पूर्वानुभव पणाला लावून हे आव्हान आपण सर्मथपणे पेलणार आहोत, त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सुध्दा आपल्याला पाठबळ लागेल, तरच आपण जिल्ह्यात भाजपला चांगले दिवस आणू शकू, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष माजी आ. धृपतराव सावळे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आ. धृपतराव सावळे यांची ३0 एप्रिल रोजी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की केंद्रात नरेंद्र मोदी, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार लोकहिताचे निर्णय घेऊन काम करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजप वाढविण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. त्या दृष्टीने आता सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत. येणार्‍या काळात नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका शिवसेना भाजपसोबत लढणार, की वेगवेगळ्या हे पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण येणार्‍या निवडणुकामध्ये जिल्ह्यात जर आपण बदल घडवू शकलो नाही, तर आपल्या नियुक्तीचे सार्थक होणार नाही. म्हणून त्यादृष्टीने पक्षात नेते, कार्यकर्ते व जनतेला सोबत घेऊन आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.