शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:02 IST

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बदलत्या शहरीकरणामुळे बुलडाणा शहरात अनेक बदल झाले असून, जास्तीत-जास्त निधी आणून शहराचा सर्वांंगीण विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. बुलडाणा नगर परिषदेच्या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बुलडाणा शहराच्या नगराध्यक्ष नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमाताई तायडे, जि. प. सभापती श्वेता महाले, धृपदराव सावळे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर पुढे म्हणाले की, बुलडाणा शहराशी माझा सुमारे ३५ वर्षांपासून संबंध असून, या कालावधीत शहरात अनेक बदल झाले आहेत. शहराचे नष्ट झालेले गतवैभव प्राप्त करून देत जिल्ह्यातील इतर शहराला दिशा देणारे शहर, अशी या शहराची ओळख निर्माण करण्यासाठी पुढील चार वर्षांचा विकास आराखडा तयार करा, तसेच शहरातील जी विकास कामे करावयाची आहेत त्याचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा. सदर प्रस्ताव मंजूर करून विकास कामांसाठी जास्तीत-जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार. अनेक दिवसांपासून शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न असून नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सदर प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ हे अभियान प्रभावीपणे राबवावे. बुलडाणा शहराच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष पदावर एका महिलेची निवड झाली. ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, असेही पालकमंत्री फुंडकर यावेळी म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जिप अध्यक्ष उमाताई तायडे, धृपदराव सावळे आणि जालींदर बुधवंत यांची समयोचित भाषणे झाली. पालकमंत्री फुंडकर यांनी २ कोटी २२ लाख रुपये निधीच्या दलित वस्ती सुधार योजना आणि ५० लाख रुपये निधीच्या रस्ते विकास कामाचे उद्घाटन केले. यावेळी नगर परिषदेचे सर्व सभापती, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.