शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची दगडाने ठेचून हत्या

By admin | Updated: December 2, 2015 02:33 IST

देऊळगावराजा तालुक्यातील घटना; पतीचे दे. मही पोलिसांपुढे आत्मसर्मपण

देऊळगावराजा(जि. बुलडाणा ): रागाच्या भरात पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी १ डिसेंबर रोजी दुपारी तालुक्यातील रोहणा शिवारातील शेतात घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: देऊळगावमही पोलीस चौकीत आत्मसर्मपण करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.रोहणा गावातील ज्ञानदेव दौलत डोके (३१) याचे लग्न आठ वर्षांंंपूर्वी बाजीउमरद जि. जालना येथील त्यांच्या मामाची मुलगी रेखा हिच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहे. आज सकाळी ज्ञानदेव डोके व पत्नी रेखा हे दोघे उपचारासाठी देऊळगावमही येथे दवाखान्यात आले होते. आपले काम आटोपून दुपारी रोहणा गावाकडे परत निघाले. टाकरखेड भागिले गावाजवळून निघणार्‍या पांदण रस्त्याने रोहणा गावाकडे जात असताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात पती ज्ञानदेव याने दगडाने रेखाच्या डोक्यावर वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने रेखाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी ज्ञानदेवने देऊळगावमही पोलीस चौकी गाठली. पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ठाणेदार ए.के. हिवाळे, चौकी अधिकारी अकिल काझी व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह देऊळगावमही येथे आणण्यात आला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंंंत ज्ञानदेव डोके याच्या विरुद्ध दे. राजा पोलिसात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर रात्री ८ वाजता मृत रेखा डोके हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.