शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:46 IST

बुलडाणा : तालुक्यातील खुपगाव येथील एकाने  संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची दुर्दैवी घटना १९  सप्टेंबर रोजी घडली. आरोपी समाधान गायकवाड याच्यावर कलम ३0२ प्रमाणे  गुन्हा दाखल करून त्याला पत्नीच्या खून प्रकरणात अटक  करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखुपगाव येथील घटनाआरोपी समाधान गायकवाडला अटक; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : तालुक्यातील खुपगाव येथील एकाने  संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची दुर्दैवी घटना १९  सप्टेंबर रोजी घडली. आरोपी समाधान गायकवाड याच्यावर कलम ३0२ प्रमाणे  गुन्हा दाखल करून त्याला पत्नीच्या खून प्रकरणात अटक  करण्यात आली आहे.बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहि तीनुसार, सहा वर्षांपूर्वी समाधान अशोक गायकवाड आणि  यशदा यांचे लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षांचा मोठा आणि  दोन वर्षांचा छोटा मुलगाही आहे. मागील काही महिन्यांपासून  समाधान पत्नीवर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये भांडण  व्हायचे. काल झालेले भांडण मात्र शेवटचे ठरले. दुपारी १  वाजेच्या सुमारास आरोपी समाधान याने रागाच्या भरात हाता त लोखंडी रॉड घेऊन यशदाच्या डोक्यात मारला. तिला  वाचविण्यासाठी त्यांची नातेवाईक योगेश्‍वरी गायकवाड मध्ये  पडली; पण तिलाही आरोपीने रॉड मारला. त्यात ती जखमी  झाली. रक्तबंबाळ अवस्थेत यशदाला गावातील पोलीस  पाटील आणि काही गावकर्‍यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल  केले.  मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने तिला अकोला  रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू  झाला. पोलिसांनी या प्रकरणात दुपारी कलम ३0७ प्रमाणे  आरोपी पती समाधानवर गुन्हा नोंदविला होता; पण  संध्याकाळी ७ वाजेदरम्यान यशदाच्या मृत्युची बातमी  मिळाल्यामुळे या प्रकरणात कलम ३0२ प्रमाणे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. खुपगावचे पोलीस पाटील विदुर तु पकर यांनी प्रकरणाची फिर्याद दिली आहे. तपास ठाणेदार ए पीआय अमित वानखेडे करीत आहेत.