शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अचानक कशामुळे गळताहेत केस? टक्कल पडणाऱ्यांची संख्या ५१ वर! घरोघरी सर्वेक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:49 IST

चर्मरोग तज्ज्ञांचे पथकाकडून तपासणी सुरू; नमुन्यांच्या अहवालानंतरच समोर येईल नेमके कारण

अनिल उंबरकार

लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (जि. बुलढाणा) : तालुक्यातील काही गावांमध्ये केस गळून टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. हा फंगल इन्फेक्शनचा प्रकार असल्याचे मत तज्ज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगावअंतर्गत बोंडगाव येथे महिला, पुरुष, लहान मुले, मुली यांचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘घाबरण्याचे कारण नाही’

लगतच्या गावातही असा संसर्ग दिसून येत असल्याने आरोग्य विभागाकडून या प्रकरणांची माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. शेगाव तालुक्यात तज्ज्ञ डाॅक्टरांकडून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यावर उपाययोजनाही करण्यात येतील, अशी माहिती येथील आमदार तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

त्यांना पुन्हा केस येतात का? : केस गळून टक्कल पडत असले तरी लवकरच त्यावर केस येणे सुरू झाले आहे. बुधवारी चर्मरोग तज्ज्ञांच्या पथकाने गावांमध्ये सर्वेक्षण केले. त्यामधून ही बाब समोर आली आहे.    

हे नेमके कशामुळे?

प्राथमिक तपासणीत फंगल संसर्गामुळे केस गळती होत असल्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नमुने तपासणीसाठी पाठविले

  • संसर्ग झालेल्या गावातील पाणी नमुने जैविक व रासायनिक तपासणीसाठी ७ जानेवारी पाठविण्यात आले आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे. 
  • सात नागरिकांच्या स्कीन तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. ते अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविले आहेत. 

गावात स्थिती कशी आहे?

  • अमूक शॅम्पू लावल्याने किंवा खाऱ्या पाण्याने केस धुतल्याने केस गळत असल्याचे गावकरी बोलत आहेत. याबाबत तीनही गावांत भीतीदायक वातावरण तयार झाले आहे.
  • याआधी गावात केस गळून टक्कल पडल्याचा असा संसर्गाचा प्रकार कधीही घडलेला नाही अशी माहिती भोनगाव येथील सरपंच राजश्री गवई यांनी दिली आहे.

आरोग्य विभाग काय करतोय?

  • शेगाव तालुक्यात घरोघरी सर्वेक्षण सुरू
  • गावात चर्मरोग तज्ज्ञांचे पथक दाखल
  • तपासणीसह गावकऱ्यांच्या शंकांचे निरसन

किती जणांना संसर्ग?

  • भोनगाव ३
  • हिंगणा वैजिनाथ ६
  • घुई ७
  • कठोरा ७
  • कालवड १३
  • बोंडगाव १६
टॅग्स :buldhanaबुलडाणाInfectious Diseaseसंसर्गजन्य रोग