शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नगर पालिकांमध्ये कुठे तिरंगी तर कुठे चौरंगी लढत

By admin | Updated: November 18, 2016 18:54 IST

बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर प्रचाराचा वेग वाढला असून, ठिकठिकाणी सभा व बैठकाचे आयोजन होत आहे.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यात २७ नाव्हेंबर रोजी नगर पालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, प्रचाराने जोर धरला आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांपैकी काहींमध्ये तिरंगी तर काहींमध्ये चौरंगी लढत होणार आहे. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, चिखली, देउळगाव राजा, मेहकर, नांदूरा, मलकापूर, या नऊ नगर पालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. मतदानाला केवळ ९ दिवस शिल्लक असल्यामुळे प्रचाराने वेग घेतला आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रचाररथ सर्वत्र फिरत असून, ठिकठिकाणी सभांचेही आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोणत्याच पक्षाने युती केली नसल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह बसपा, एमआयएम, भारिप बहुजन महासंघ या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. यासोबत अपक्षही आहेतच. निवडणुकीत विजयी होण्यासोबतच पाडा पाडीचे राजकारही मोठय़ा प्रमाणात केल्या जाते. त्यामुळे विजयी होण्यासाठी उमेदवार उभे राहतातच मात्र त्यासोबतच काहींना पाडण्याकरिताही अनेक उमेदवार रिंगणात उतरतात किंवा त्यांना उतरविल्या जाते. जिल्ह्यातील नगर पालिकांमध्ये सध्या मतदारांना हाच अनुभव येत आहे. काही नगर पालिकांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख चार पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. तर काही ठिकाणी भारिप व एमआयएमच्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. बुलडाणा नगर पालिकेत अध्यक्षाच्या एका जागेकरिता १५ जण रिंगणात आहेत तर २७ जागांसाठी १८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपकडून कुंदा पाटील, शिवसेनेच्या पुजा गायकवाड, राष्ट्रवादीच्या अनिता शेळके, काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी काकस या चौघांमध्ये चौरंगी लढत होणार आहे. यासोबतच भारिपच्या तिकिटावर असलेल्या उमेदवार यांना मुस्लीम व दलित समाजाचे मतदान मिळाले तर त्या बाजी मारू शकतात. देउळगाव राजा नगर पालिका मतदारसंघात शिवसेना भाजपने युती केली असून, तिरंगी लढतीचे चित्र आहे. भाजप व शिवसेनेच्या उमेदवार सुनिता शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलावती खांदेभराड व काँग्रेसच्या मिना दराडे यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. मेहकरमध्ये काँग्रेसचे उमेदवार कासम गवळी आहेत तर शिवसेनेच्यावतीने भाष्करराव गारोळे, भाजपचे प्रल्हादअन्ना लष्कर, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अँड. लक्ष्मण फोकरे तर एमआयएमच्यावतीने शेख चांद कुरेशी रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख लढत काँग्रेसचे कासम गवळी, शिवसेनेचे भाष्करराव गारोळे व एमआयएमचे शेख चांद कुरेशी यांच्यामध्ये होणार आहे. खामगावमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाने आघाडी केली आहे. या आघाडीच्या उमेदवार शांताबाई सोनोने व भाजपच्या उमेदवार अनिता डवरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. शेगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी बुरूंगले, भाजपच्या शकूंतला बूच, प्रहारच्या तिकिटावर असलेल्या माधूरी देशमुख व शिवसेनेच्या कुसूम हाडोळे या रिंगणात आहेत. या चौघांमध्येच लढत होणार आहे. नांदूरा, मलकापूर व चिखली नगर पालिकेतही तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. उमेदवार आपआपल्या परीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे आहेत अध्यक्षपदाचे उमेदवार बुलडाणा              १५ देउळगाव राजा     ११ चिखलीत            ११ मेहकर                 ९ खामगाव              ५ जळगाव जामोद     ५ मलकापूर            १८ शेगाव                १२ नांदूरा                  ९