शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

जेव्हा खुद्द आमदार दारू अड्डय़ावर धाड टाकतात..!

By admin | Updated: August 18, 2016 00:50 IST

सिंदखेड राजा तालुक्यात अवैध दारूचा महापूर; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे होणारे दुर्लक्ष आमदारांनी दारू अड्डय़ावर धाड टाकली.

चिखली (जि. बुलडाणा), दि. १७: दारूमुळे होणारे दुष्परिणाम, अवैध दारूमुळे होणारी जीवितहानी पाहता त्यास पायबंद घालणे राज्य उत्पादन शुल्काची जबाबदारी. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने सिंदखेड राजा तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधान आले आहे. याची दखल घेत खुद्द आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी १७ ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री अड्ड्यावर धाड टाकल्याने शासकीय यंत्रणेसह अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.सिंदखेड राजा तालुका हा मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असल्याने मराठवाड्यातील जालना जिल्हय़ातून ही नामवंत कंपन्यांची बनावट दारू तालुक्यात दाखल होत असून, ही बनावट दारू म्हणजे स्लो पॉयझन असून, या दारूत वापरले जाणारे घटक प्रमाणित नसून, ती बनविण्याची प्रक्रियादेखील मान्यताप्राप्त नसल्याने त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटनाही घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा सर्व प्रकार राजरोस घडत असताना राज्य उत्पादन शुल्कला या बनावट दारूस आळा घालण्यात सपशेल अपयश आले आहे. तथापि पोलिसांचेही दुर्लक्ष असल्याची तक्र ार नागरिकांकडून होत असल्याने लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार डॉ.शशिकांत खेडेकर हे १७ ऑगस्ट रोजी राहेरी ते वर्दडी मार्गाने जात असताना उगले पांगरी फाटानजिक एका शेतात शेडनेटचे छत टाकून त्यामधे दारू व्रिक्रीचे अस्थायी दुकान थाटले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. यावर आमदारांनी गाडी थांबवून स्वत: दारूच्या गुत्त्यावर गेले संबंधिताकडे दारू आहे का? अशी विचारणा केली असता तेथील दारू दारूविक्रेत्याने होकार दर्शवून चक्क दारू देण्याची लगबगदेखील चालविली. मात्र, थोड्याच वेळात समोरची व्यक्ती आमदार डॉ. शशिकांत खेडेकर असल्याचे समजताच त्याची चांगलीच पाचावर धारण बसली. दरम्यान, तेथून आ.डॉ. खेडेकर यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदारांना सदर प्रकाराची माहिती देऊन यापुढे कुठेच अवैध दारू विक्री करणारे आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. या घटनेमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.