शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभरा व करडईला मिळणार विमा संरक्षण

By admin | Updated: November 5, 2014 23:52 IST

कृषी विभागाच्या पीक विमा योजनेत समावेश : रब्बी हंगामाला मिळणार लाभ.

खामगाव (बुलडाणा): राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना २0१४-१५ अंतर्गत रब्बी हंगामातील पिकासाठी विमा संरक्षण म्हणून पीक विमा योजना भरण्याची शासनाकडून मान्यता आहे. या पीक विमा योजनेत जिल्ह्यातील गहू (बागायत, जिरायत), हरभरा व करडई या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. पावसाने कृपा केली तरच भरघोस उत्पादन शेतकर्‍यांना मिळते. कधी अतवृष्टीमुळे तर कधी अपुर्‍या पावसामुळे, गारपिटीमुळे, रोगराईमुळे उत्पादनात घट येते. या परिस्थितीत शेतकरी किफायतशीर शेती करू शकत नाही. बँकेकडून घेतलेले पेरणीचे कर्जही फेडू शकत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाने पूर्वीची सर्वंकष पीक विमा योजना बंद करून सुधारित नवीन राष्ट्रीय पीक विमा योजना सन १९९९-२000 पासून लागू केली आहे. आपत्तीसमयी शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार सहभागी होऊ शकतात. पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून पंचनामे करून निश्‍चित करण्यात येणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना ५0 टक्के पीक विमा हप्त्यात अनुदान राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील गहू (बागायत) पीक विमा योजनेत तेराही तालुक्यांचा समावेश आहे. तर गहू (जिरायत) पीक विमा शेगाव, मेहकर, लोणार तालुक्यासाठी राहणार आहे. हरभरा पिकासाठी चिखली, बुलडाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव व नांदुरा या दहा तालुक्यांना समाविष्ट केले आहे. करडई पिकाचा विमा चिखली, बुलडाणा, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यासाठी लागू होणार आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा पीक विमा संरक्षणासाठी शेतकर्‍यांनी पेरणीपत्र व सातबारा तलाठीकडून घेऊन ज्या बँकेत शेतकर्‍यांचे खाते असेल त्या बँकेत विहित नमुन्यातील अर्जासह पीक विमा रकमेचा बँकेत भरणा करावा, असे तालुका कृषी अधिकारी एम.डी. जाधव, तालुका कृषी अधिकारी, खामगाव यांनी सांगीतले.