शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जे केले ते कायद्याच्या चौकटीतच केले : एकनाथ शिंदे

By निलेश जोशी | Updated: May 12, 2023 17:16 IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर पांडुरंगाच्या पुजेचा मान, आता परमभक्त चोखोबाराय यांच्या दर्शनाचा लाभ

इसरूळ (जि. बुलढाणा): वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे भूषण आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पांडुरंगाच्या पुजेचा मान मिळाला होता. आता त्यांचे परमभक्त संत श्री चोखोबाराय यांच्या मंदिराचे लोकार्पण आणि दर्शनाचा लाभ झाला. गेले काही महिने काय होईल, याचीच चर्चा होती. पण जे काही केल ते घटनेच्या चौकटीत कायदेशीर. बहुमताचा आदर आणि सन्मान असतो. त्यामुळे निकालही या भक्ताच्या बाजूने लागला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ येथे श्री संत चोखोबाराय यांच्या मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खा. प्रतापराव जाधव, आ. संजय रामुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, किरण सरनाईक, आ. नारायण कुचे, हरिभाऊ बागडे, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अेामसिंग राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, इसरुळ येथे उभे राहिलेले हे मंदीर पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी किर्तनातून गोळा केलेल्या पैशातून उभे राहिले आहे. त्याचा आदर्श आज घेण्याची गरज आहे. किर्तनकार आपल्या प्रबोधनातून समाज जीवन प्रकाशमान करत असतो. सत्ताकारण, राजकारणाच्यावर संत परंपरा आहे. त्याचा आपणास अभिमान आहे.वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. आजच्या कलीयुगात बॅलन्स (समतोल) राखण्याचे काम वारकरी संप्रदाय करत आहे. भक्ती साधनेच्या माध्यमतून हे साध्य होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही संत परंपरेला महत्त्व होते. तेस आपल्या आयुष्यातही त्याला महत्त्व आहे. सत्ता स्थापनेपासून आम्ही घेतलेले सर्व निर्णय जनसामान्याच्या हिताचे आहेत. आपण मुख्यमंत्री नाही तर एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहू, असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे