शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमधील गर्दीचे करायचे काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:56 IST

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत़ बँकांची वेळही कमी करण्यात आल्याने ...

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लावण्यात आले आहेत़ बँकांची वेळही कमी करण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे़ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बुलडाणा आणि डाेणगाव शाखेत साेमवारी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती़ त्यामुळे काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे़

गत काही दिवसांपासून राज्यभरात काेराेना संसर्ग वाढत आहे़ वाढत्या काेराेना संसर्गाला राेखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययाेजना सुरू केल्या आहेत़ यामध्ये १५ एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ तसेच बँकाची वेळही कमी करण्यात आली आहे़ बँकांचे कामकाज सकाळी ११ ते २ पर्यंतच असल्याने शहरासह ग्रामीण भागात नागरिकांची माेठी गर्दी हाेत आहे़ अनेक बँकांसमाेर रांगा लागत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे़ बँकांकडून विविध उपाययाेजना करण्यात येत असल्या तरी माेठ्या प्रमाणात हाेत असलेली गर्दी राेखण्यात त्यांना अपयश येत आहे़ त्यामुळे, शासनाने बँकाच्या वेळा वाढवण्याची गरज आहे़

स्टेट बँका, शाखा बुलडाणा

बुलडाणा शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही येतात़ त्यामुळे, शाखेत दरराेज गर्दी हाेते़ विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागतात़ लाेकांना काेराेनाविषयक नियमांचे पालन करायला लावण्यासाठी चाैकीदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ मात्र, तरीही अनेक जण फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत़

स्टेट बँक शाखा डाेणगाव

महामार्गावरील डाेणगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेत परिसरातील ग्रामस्थ आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात़ बँकेत एकच कॅश काउंटर असल्याने माेठ्या प्रमाणात रांगा लागतात़ यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याने काेराेना संसर्ग पसरण्याची भीती आहे़ बँकेकडून विविध उपाययाेजना केल्या असल्या तरीही गर्दी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने नियमांचे पालन करण्यात अडचणी येतात़

बँकेत एकच काउंटर असल्याने बँकेत गर्दीमध्ये उभे राहावे लागते. त्यामुळे बँकेने कॅश काउंटर वाढविल्यास गर्दी होणार नाही व रांगेत उभे राहावे लागणार नाही. अबरार खान, डोणगाव

विदर्भ क्षेत्रीय कोकण ग्रामीण बँकेने ग्राहकांना उन्हात बाहेर उभे न करता बँकेमार्फत त्यांना उभे राहण्यासाठी समोर मंडप टाकावा. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे ग्राहकांना पालन करण्यास सांगावे व कॅश काउंटर वाढवावे.

विजय खरात, डोणगाव

बँकेची वेळ कमी झाल्याने गर्दी वाढत आहे. एकाच वेळी सर्वांना आर्थिक व्यवहार करायचे असल्याने बँकेच्या शाखांमध्ये गर्दी वाढत आहे. त्यामुळे, बँकांची वेळ वाढवण्याची गरज आहे

अमाेल वानखडे, ग्राहक, बुलडाणा

सध्या ग्राहकांच्या हितासाठी कोरोनाकाळात बँकेत फक्त नगदी रोकड काढणे व इतरत्र पाठविणे हे आवश्यक व्यवहार बँकेमार्फत सुरू आहेत़ नागरिकांनी इतर कामासाठी बँकेत येऊ नये व गर्दी करू नये़ तसेच कोविडच्या नियमांचे पालन करावे. अमोल नाफडे, शाखाधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया डोणगाव