शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीचा ऱ्हास - सेवाव्रती राधादीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 11:48 IST

पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली.

- अनिल गवई

खामगाव : जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळेच पाश्चात्य देशांमध्येही या संस्कृतीचे अनुकरण होत आहे. भारतात मात्र, विपरीत परिस्थिती दिसून येते. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृतीवर मोठे आघात होताहेत, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, अशी खंत कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या जीवन सेवाव्रती राधादीदी यांनी व्यक्त केली. खामगाव येथील जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराजांनी स्थापन केलेल्या ‘तपोवन’ला भेट देण्यासाठी त्या खामगाव येथे आल्या असता, ‘लोकमत’शी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्यांबाबत त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. जगात प्रत्येकाला शांतता हवी असल्याने, भारतीय संस्कार आणि योग संस्कृतीला डोक्यावर घेतले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रश्न: मनुष्य जीवनात संस्काराचे महत्व काय?उत्तर:  सतशील आचरण हा भारतीय संस्कृतीतील महत्वपूर्ण पैलू आहे. त्यामुळेच कदाचित जगातील इतर संस्कृती आणि समाजव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. दातृत्व हाच भारतीय संस्काराचा गाभा असल्याने मानवी जीवनात आजही संस्काराचे अनन्यसाधारण महत्व आहे.

प्रश्न: चंगळवादाचा भारतीय संस्कृतीवर विपरीत परिणाम होतो का?उत्तर: निश्चितच, भौतिक आणि चंगळवाद ही पाश्चिमात्य संस्कृतीची देणं मानली जाते. मात्र, हल्लीच्या काळात भारतीय समाजमनावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे मनुष्य भरकटल्या जात आहे. तमाम भारतीयांसाठी ही बाब निश्चितच भूषणावह नाही.

प्रश्न: भारतीय संस्कृती श्रेष्ठ असल्याचे परिमाण काय?उत्तर: भारतीय ऋषी, मुनी, संत आणि मंहतांनी त्याग आणि समर्पणातून भारतीय संस्कृतीचा वारसा पुढे नेला आहे.  भारतात पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असतानाच, दुसरीकडे पाश्चिमात्य देशात भारतीय संस्कृतीचे अनुकरण केल्या जात आहे. ही भारतासाठी गौरवास्पद बाब आहे. भूतदयेबाबत आजही भारतीयांच्या मनात  संवेदना जीवंत आहे, हेच भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आहे.

प्रश्न: समाजातील गुन्हेगारीला कसा आळा बसेल?उत्तर: जगातील सगळ्याच चांगल्या गोष्टी शिकाव्या लागतात. संस्कारही आत्मसात करावे लागतात. याउलट चोरी, लबाडी मनुष्य आपोआपच शिकतो. यासाठी त्याला कुठल्याही संस्कारवर्गात जाण्याची गरज नाही. शॉर्टकटच्या नादात समाजातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. लालसेमुळे समाजात विकृतताही वाढीस लागली आहे, ही वस्तुस्थिती असली तरी, कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून गुन्हेगारीकरण रोखणे सहज शक्य आहे. 

प्रश्न: संस्कार मूल्य रुजविण्यासाठी स्वामी विवेकानंद केंद्राचे योगदान काय?उत्तर: भारतीय समाजमनात संस्कार मूल्याची रूजवण करण्यासाठी आसामसह देशातील विविध राज्यात कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. बालक, युवा आणि महिलांच्या सर्वागिंण विकासासाठी स्वामी विवेकानंद केंद्राचे जीवन सेवाव्रती अहोरात्र झटत आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत शिक्षणाचीही सुविधाही केंद्राच्यावतीने उपलब्ध करून दिल्या जात आहे.

प्रश्न: युवा वर्गासाठी आपला संदेश काय?उत्तर: युवक हेच या देशाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. बलशाली भारत घडविण्यासाठी युवकांनी मनभेद आणि मतभेद विसरून संघटीत होणे काळाची गरज आहे. मोह, माया आणि लालसा या त्रिसुत्रीने कुणाचंही भलं झालं नाही, हाच प्रमुख संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून राहील!

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा