सिंदखेडराजा : पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यंदाचे विदर्भ साहित्य संमेलन मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजित करण्याच्या घोषणेचे सिंदखेडवासीयांनी स्वागत केले आहे.
शनिवारी बुलडाणा येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी साहित्यिक प्रा.नरेंद्र लांजेवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. संमेलनाचे सिंदखेडराजा येथे आयोजन करा त्यासाठी विदर्भ साहित्य संघाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही डॉ. शिंगणे यांनी सांगितले होते. दरम्यान, रविवारी सकाळी डॉ. शिंगणे हे सिंदखेडराजा येथे आले असता सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन संमेलनाच्या संदर्भात केलेल्या घोषणेचे स्वागत केले. याच बैठकीत डॉ. शिंगणे यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव करण्यात आला. आम्ही साहित्य संमेलन ऐकत आलो, पाहत आलो परंतु सिंदखेडराजा येथे होणारे हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येणार असल्याच्या प्रतिक्रिया सिंदखेडराजा येथे उमटत आहेत.
कोट...
-संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होणार आहे. हे साहित्य संमेलन सिंदखेडराजाच्या इतिहासात नोंदले जाणार असल्याचा आनंद आहे.
- अॅड. नाझेर काजी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
--------------