शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पर्यटक, नागरिक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:52 IST

लोणार : जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहरात दिवसातून तीन  वेळा भारनियमन होत असल्यामुळे पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी  यांना त्रास  होत आहे.  यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा  कमी करावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक  अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी ४ ऑक्टोबर रोजी उपकार्यकारी  अभियंता यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देदिवसा भारनियमन बंद करण्याची मागणीशिवछत्र मित्र मंडळाने दिले उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : जागतिक पर्यटन स्थळ लोणार शहरात दिवसातून तीन  वेळा भारनियमन होत असल्यामुळे पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी  यांना त्रास  होत आहे.  यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा  कमी करावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक  अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी ४ ऑक्टोबर रोजी उपकार्यकारी  अभियंता यांच्याकडे केली आहे. मागील काही दिवसांपासून रोज ६ तास ते १२ तासांपयर्ंत  भारनियमन होत आहे. मुळातच प्रचंड उकाड्यामुळे नागरिक  त्रस्त असताना आणि अनेक भागात पावसानंतर रोगराई  पसरण्याची भीती असताना हे भारनियमन सुरू झाले आहे.  त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.  कोळशाच्या टंचाईमुळे औष्णिक वीजनिर्मिती संच बंद पडले  असून, राज्याला १ ते १.५ हजार मेगावॅटचा तुटवडा जाणवतो  आहे, त्यामुळे अन्याय पद्धतीने व अकस्मातपणे हे भारनियमन  सुरू झाले आहे. महानिर्मिती कंपनीने कोळशाचा किमान १५  दिवसांचा साठा करण्याच्या बंधनाकडे दुर्लक्ष केल्याने ही गंभीर  परिस्थिती उद्भवली आहे. भारनियमनाचे हे संकट प्रशासकीय  निष्काळजीपणाचा परिणाम असून, त्याचे परिणाम सर्वच  घटकांना भोगावे लागत असल्याचे शिवछत्र मित्र मंडळ अध्यक्ष  नंदकिशोर मापारी यांनी म्हटले आहे. सध्या कृषी क्षेत्राकडून  आणि अन्य ग्राहकांचीही विजेची मागणी वाढली आहे.  विजेअभावी कृषी पंप बंद पडून शेतीला पाणी देणे अशक्य झाले  आहे. यंदा पहिल्या आठवड्यातच ऑक्टोबर हीट जाणवत  असून, भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही प्रचंड हाल  सोसावे लागत आहेत. ठराविक वेळेतच पाणीपुरवठा होणार्‍या  शहरांमधील पाण्याचे वेळापत्रकही कोलमडले आहे. शासकीय  व खासगी रुग्णालयांमधील उपचारसुद्धा प्रभावित झाल्याच्या  तक्रारीसमोर आल्या आहेत.  जागतिक पर्यटन स्थळ लोणार  शहरात दिवसातून तीन वेळा भारनियमन होत असल्यामुळे  पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत  आहे. यामुळे दिवसाचे भारनियमन बंद किंवा कमी करण्यात  यावे, अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष  नंदकिशोर मापारी यांनी ४ ऑक्टोबर रोजी उपकार्यकारी अभियं ता, लोणार यांच्याकडे केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख  पांडुरंग सरकटे, कृ.उ.बा.समिती संचालक तेजराव घायाळ,   शिवसेनेचे युवा कार्यकर्ते शंकर डोळे, पं.स.सदस्य मदन सुटे,  अरुण गीते, पांडुरंग मुंढे, संतोष सांगळे, सुनील डोळे, मनोहर  ढाकरके, महादेव सांगळे, गजानन आटोळे उपस्थित होते.