शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न झालं, वऱ्हाड निघालं, गाडी थांबली अन् वधू पळाल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 12:13 IST

Bride Ran away News तीन तरुणांची लग्न करून देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देजालना शहराजवळील नागेवाडी येथे लघुशंकेचे निमित्त करीत गाडी थांबवली. तिन्ही मुली तीन मोबाईल, रोख ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील तीन तरुणांची लग्न करून देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी फसवणूक केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील तीन मुलींनी वकिलांकडून बॉन्ड करून तीन तरुणांशी ७ जानेवारी रोजी लग्न केले. त्यानंतर ८ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास तीन वर, तीन वधू व अन्य एक व्यक्ती कारने गुजरातकडे निघाले असता जालना शहराजवळील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करीत गाडी थांबवली. त्यानंतर तिन्ही मुली तीन मोबाईल, रोख रक्कम ३० हजार असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झाल्या. याप्रकरणात गुजरात येथील पीयूष शांतिलाल वसंत यांच्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

 मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील पीयूष शांतिलाल वसंत (रा. जुनागड) यांच्या तीन मित्रांचे लग्न जमत नव्हते. त्यांनी जालना येथील मित्र पाशाभाई (पूर्ण नाव माहीत नाही) याला फोन करून मुलींबाबत विचारणा केली. त्याने पियुष वसंत यांना जालना येथे बोलावून घेतले. त्यानंतर तीन मुलांसह ते देऊळगाव राजा येथे गेले होते. तेथील एका महिलेने तीन मुली दाखविल्या. तिन्ही तरुणांनी लग्न करण्यास होकार दिला आणि वकिलाकडून बॉन्ड करून कायदेशीर लग्न केले.

त्यानंतर तीन मुली, अन्य एका व्यक्तीसह वाहनाने गुजरातकडे निघाल्या. जालना-औरंगाबाद रोडवरील नागेवाडी येथे आल्यावर मुलींनी लघुशंकेचे निमित्त करीत गाडी थांबवायला लावली. अंधाराचा फायदा घेऊन मुली फरार झाल्या. पीयूष वसंत यांनी संबंधित महिलेला फोन करून मुली पळून गेल्याचे सांगितले असता, त्या महिलेने त्यांनाच धमकी दिली. यानंतर पीयूष वसंत यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :khamgaonखामगावJalanaजालनाjunagadh-pcजुनागडCrime Newsगुन्हेगारी