शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना मिळणार हवामानाची माहिती!

By admin | Updated: June 19, 2017 04:27 IST

एसएमएस सुविधा; बुलडाणा जिल्ह्यातील ५0 हजार शेतक-यांना लाभ.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पावसाच्या लहरीपणामुळे बर्‍याच वेळा शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन शेतकर्‍यांना हे नुकसान टाळता येणार आहे. यात एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना हवामानाची माहिती दिली जाणार आहे. शिवाय पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना मिळत आहे.शासनाच्या किसान एसएमएस सेवातून मोबाइलवर मोफत एसएमएस सेवेद्वारे शेतकर्‍यांना शेतीसल्ला दिला जातो. राज्यात २0१३ मध्ये ही सेवा चालू झाल्यानंतर डिसेंबर २0१३ अखेर ६ लाख ५0 हजार एवढी नोंदणी होती. जुलै २0१४ अखेर ८ लाख ५0 हजार एवढी झाली. २0१५ मध्ये राज्यात सुमारे १५ लाख ४१ हजार ३९८, तर मार्च २0१६ पर्यंंंत हा आकडा २0 लाख होता. आता २0१७ मध्ये लाभार्थी शेतकर्‍यांचा आकडा ४५ लाखांवर पोहचला आहे. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यसंवर्धन, हवामान विभाग व फलोत्पादन या विभागांमार्फत मोफत एसएमएसद्वारा शेतकर्‍यांना कृषी सल्ला मिळतो. आता केंद्राच्या किसान एसएमएसच्या सेवेमधून शेतकर्‍यांना पीकविषयक सल्ले, माती परीक्षण, सिंचन सुविधा, बाजारभाव, विविध योजनांची माहिती मिळत आहे, तर जुलै २0१७ पासून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे हवामानाची माहितीही प्राप्त होणार आहे. यामुळे खरीप व रब्बी पेरणी करताना मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात शेतक-यांना मिळणार लाभविविध योजनांचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांकडून मोबाइल नंबर नियमित घेतले जातात. त्यामुळे ३0 हजार ६५७ एवढय़ा शेतकर्‍यांना मोफत एसएमएस कृषी सल्ला दिला जात होता. जिल्ह्यात २0१६-१७ मध्ये १९ हजार ३४३ शेतकर्‍यांचे मोबाईल क्रमांक नव्याने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आता किसान एसएमएस सेवा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील ५0 हजार शेतकर्‍यांना हवामानाचा अंदाज समजणार आहे.प्रत्येक १0 मिनिटांनी अंदाजसध्या किसान एसएमएस सेवा सुरू आहे. त्यातील लाभार्थी शेतकर्‍यांना स्वयंचलित हवामान केंद्रात संकलित होणारा हवामानाचा अंदाज प्रत्येक १0 मिनिटांनी एसएमएसद्वारे उपलब्ध केला जाणार आहे. १२ किलोमीटरच्या परिसरातील शेतकर्‍यांना एका केंद्रातून हवामानाचा अचूक अंदाज प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यात २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येत आहेत.