शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीक नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 13, 2014 00:08 IST

सावत्रा परिसरात सोयाबीन पाठोपाठ मुगावरही करपा.

सावत्रा : परिसरात सोयाबीन पीकावर करपा आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. परंतु सततचा पाऊस आणि खराब वातावरणामुळे आता मूग पीक शेवटच्या टप्प्यात असतांना परिसरातील पिकावर करपा येत आहे. १ हजार २00 शेतकर्‍यांनी निव्वळ मूग व काहींनी कपाशी अंतर पीक म्हणून मूग पेरा केला. मात्र या पिकांवर करपा येत असल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मृग नक्षत्रातच पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तब्बल ४५ दिवस खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर थोड्या बहुत प्रमाणावर झालेल्या पावसावर परिसरातील शेतकर्‍यांनी सोयाबीनसह मूग, का पूस व उडीद आदी पीक पेरा केला. मात्र आता या खरीप पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. परिसरातील जवळपास १ हजार २00 शेतकर्‍यांनी निव्वळ मूग व काहींनी कपाशी अंतर पीक म्हणून मूग पेरा केला. मेहकर कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सावत्रा येथील ३0 हेक्टरवर मूगाचा प्लॉटींग प्रयोग केलेला आहे. त्यावरुन एक गुंठय़ात होणार्‍या उत्पन्नावरुन तालुक्याचे सरासरी उत्पन्न काढले जाते. परिसरातील मूग पीक हे शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मूग पीक करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मूग पीकाचा उत्पन्नाचा अंदाज चुकणार आहे. जवळपास सर्वच कास्तकारांनी मूग पिकाचा विमा काढलेला आहे, मात्र पाऊस आणि खराब वातावरणामुळे पिक खराब होण्याच्या मार्गावर आहे. मूग पिकाचा सर्वे करुन मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.