शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वानखेड येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 19, 2017 00:32 IST

जलपातळी खालावल्याने पाणीपुरवठा लांबणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवानखेड : यावर्षी मार्च, एप्रिल महिन्यापासूनच कडक उन्ह तापत असल्यामुळे त्याचा परिणाम गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतावर होवून पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे मे महिन्यातील कडक उष्णतामानात वानखेड येथे भीषण पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येमुळे गावात आठवड्यातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास ह्याहीपेक्षा पाण्याची समस्या बिकट होवू शकते. यावर उपाय म्हणून गावाजवळील शेतामधून विहिर अधिग्रहीत करून त्याव्दारे गावाला पाणी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. ह्याबाबत सविस्तर असे की, संग्रामपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वानखेड गावाची लोकसंख्या आठ हजाराच्या जवळपास आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून तीन बोअरवेल व एका मोठ्या विहिरीव्दारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून कडक उन्ह तापत असल्यामुळे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पाण्याची पातळी खोलवर तळाशी गेल्यामुळे पाणी पुरवठा आठ दिवसातुन एक वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली. पाणीटंचाई ची समस्या निर्माण झाल्यामुळे १७ मे रोजी वार्ड क्र.४ व ५ मधील महिला नागरीकांनी ग्रामपंचायतमध्ये येवून पाणी समस्येबाबत विचारणा करून पाणी समस्या त्वरीत सोडवा अशी मागणी केली. तर दोन-तीन दिवसात गावाजवळ असलेल्या एका बोअरवेलमध्ये इलेक्ट्रीक मोटार बसविली जावून त्यावरून पाणी पुरवठा करण्यात येईल तसेच इतरही पर्याय निवडून सर्वांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे सरपंच अंजना सोळंके, ग्रामसेवक धनावडे ग्रामसेवक यांनी सांगितले.