शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरण न होताच होतो पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:20 IST

लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या  पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात  जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देआरोग्य विभागाचे दुर्लक्ष जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले!पाण्याचे नमुने गोळा करून तपासणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या  पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात  जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हास्तरीय पथक तसेच आरोग्य कर्मचार्‍यांनी गावांतील  पाणीपुरवठा योजना, स्रोतातून नमुने गोळा करून त्याची त पासणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत केली पाहिजे.  पाणी नमुने तसेच ब्लिचिंग पावडरचीही तपासणी झाली पाहिजे;  परंतु आरोग्य विभागाकडून कुठल्याच प्रकारची तपासणी होत  नसल्याने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.  ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता कमालीची घसरलेली असल्यामुळे  त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण २0 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे  दिसून येते. तसेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच  उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली आहे. पावसाळ्याच्या  दिवसात ग्रामस्थांना ब्लिचिंग पावडरने निर्जंंतूक केलेल्या शुद्ध  पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे, मात्र याकडे दुर्लक्ष होत  आहे.

या गावांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठालोणार तालुक्यातील  वझर आघाव, खापरखेड, खळेगाव,  शिवनी जाट, पार्डी सिरसाट गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत  असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यामुळे या गावांमध्ये  सातत्याने जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.  त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, हगवण, अतिसार,  विषमज्वर या आजारांच्या रोग्यांचा समावेश आहे. या  आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे निर्देश  देण्यात आले आहेत. 

पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांपासून ग्रामस्थांचे  रक्षण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश  देण्यात आले. गावात शुद्ध पाणीपुरवठा झाल्यास या रोगांना प्र ितबंध होतो.- डॉ.अनंत पबितवार, तालुका आरोग्य अधिकारी, लोणार.