शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात होणार वाढीव दाबाने पाणीपुरवठा

By admin | Updated: July 2, 2017 19:53 IST

खामगाव : शहरात लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत चारही झोन कार्यान्वित करण्यात येणार असून अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरात लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत चारही झोन कार्यान्वित करण्यात येणार असून अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नवीन दोन्ही पाण्याच्या टाक्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आल्याने पाणीपुरवठ्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.सद्यस्थितीत खामगाव शहराला गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून पाणी पाईपलाईनद्वारा जळका भडंग येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्दीकरण केले जाते. त्यानंतर घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीत साठवून तेथून त्याचा शहराच्या अर्ध्या भागास पुरवठा केला जातो. तर उर्वरित शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीतून वामन नगरातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जाते. नॅचरल ग्रॅव्हिटीद्वारा हे पाणी येथपर्यंत पोहचल्यानंतर टाकीत चढविले जाते. व शहराच्या अर्ध्या भागास त्याचा पुरवठा होतो.या प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होत असल्याने घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता २१ लाख लिटर तर वामननगर टाकीची क्षमता १७ लाख लिटर एवढी आहे. साठवण क्षमता कमी असल्याने उपसा यंत्र फक्त १८ ते २० तास सुरु राहते व शहराला ६-७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याकरिता शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना शिर्ला नेमाने येथील प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेली आहे. सुमारे ७५ कोटी रुपयाच्या या योजनेचे काम सन २००९ पासून सुरु असून अजूनही पूर्ण झालेले नाही. या योजनेंतर्गत दोन नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. चार टाक्यांच्या माध्यमातून शहराचे चार भाग (झोन) करुन पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात पाईपलाईन लिकेजेसची समस्या मोठी असल्याने या योजनेंतर्गत टाकलेल्या नवीन पाईपलाईनवरुन दोन झोनअंतर्गत पाणीपुरवठा सुध्दा अक्षयतृतियेलाच सुरु करण्यात आलेला आहे. तर आता दोन नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यात रावणटेकडी येथील पाण्याच्या टाकीचे काम १०० टक्के तर शेलोडी रोडवरील पाण्याच्या टाकीचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या टाक्यांच्या माध्यमातून लवकरच शहरात पाणीपुरवठा सुरु होईल. यामध्ये घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीतून रावणटेकडीवरील टाकीत पाणी सोडले जावून त्याचा पुरवठा शहरातील काही भागात केला जाईल तर रावणटेकडीवरील टाकीतून शेलोडी रोडवरील टाकीत पाणी सोडून येथून काही भागात पाणीपुरवठा होणार आहे. गेरु माटरगाव व शिर्ला नेमाने दोन्ही धरणातून उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये एकच व्हॉल्व्ह राहणार असल्याने पाण्याचा दाब वाढणार असून सध्याची कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार दूर होणार आहे.तसेच १-२ दिवसाआड पाणीपुरवठा होवू शकेल. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.