शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 13:01 IST

खामगाव: गेरू  माटरगाव येथील धरणावरील पंपींग वारंवार खंडीत होत असल्याने, शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे.

खामगाव: गेरू  माटरगाव येथील धरणावरील पंपींग वारंवार खंडीत होत असल्याने, शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडला आहे. जॅकवेलमध्ये पाण्याचा संचय होत नसल्याने, नागरिकांना तब्बल १३ दिवसापर्यंत पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शुक्रवारी धरणावरील जॅकवेलमध्ये जलसंचय न झाल्याने, धरणावरील पंपींग वारंवार प्रभावित झाले. तब्बल तीन वेळा पंपीग करूनही अपेक्षीत जल संचन न झाल्यामुळे  केला नगर, राम मंदिर, मुक्तानंद नगर, डी.पी.रोड यासह शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठा खंडीत आहे. अपेक्षीत जलसंचय होईपर्यंत शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, एकाच महिन्यात वारंवार पाणी पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरिक मेटाकुटीस आले आहेत. विलंबाच्या पाणी पुरवठ्यावरून नगर पालिका प्रशासन आणि नागरिकांचे वारंवार खटकेही उडत असल्याचे दिसून येते.

१३ व्या दिवशीही पाणी नाही!तांत्रिक अडचणीमुळे खामगाव पालिका प्रशासनाकडून सलग अकराव्या दिवशी पाणी पुरवठा होवू शकला नाही. शनिवारी देखील काही भागात पाणी पुरवठा होवू शकणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारी पहाटे पंपींग सुरू करण्यात आले. मात्र, जॅकवेलमध्ये जलसंचय न झाल्याने सकाळी ९:३० वाजता पहिल्यांदा पंप बंद पडला. त्यानंतर ११ वाजता पुन्हा एकदा पंपीग करण्यात आले. परंतु, दुपारी १ वाजता पंपीग बंद पडले. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून दुपारी २ वाजता पंपीग सुरू केले. मात्र, दुपारी ४:३० वाजता जॅलवेलमध्ये जलसंचय न झाल्याने, तिसºयांदाही पंपीग बंद पडले. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा आता प्रभावित झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव