शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यात ९ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:49 IST

Water scarcity in Buldhana : यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असून ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  सुमारे २ लाख १९ हजार लोकसंख्या असलेल्या बुलडाणा तालुक्यात यंदा पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असून ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान, १७ गावांतील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पैनगंगा नदीचा उगम असलेल्या व काळ्या पाषाणाचा भाग असलेल्या तालुक्यातील या नदी क्षेत्रालगतच्या भागात प्रामुख्याने टंचाईची दरवर्षी तीव्रता जाणवत असते. त्यातच मधल्या काळात या पैनगंगा नदीवर १ दलघमी क्षमतेचे ८ मायनर टँक उभारण्यात आल्याने अलीकडील काळात या भागातील टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. त्यात यावर्षी तीन गावांची भर पडली आहे.बुलडाणा तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १ कोटी ९८ लाख रुपयांचा आहे. यावर्षी तालुक्यातील ९६ गावांपैकी ५६ गावांना टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी आहे. विहीर अधिग्रहणासाठी यंदा २८ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात प्रसंगी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता पंचायत समितीमधील सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तालुक्यातील यावर्षी किमान १३ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यापैकी सध्या ९ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. त्या गावांना दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी टंचाई निवारणासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची गरज आहे.

२५ गावात विंधन विहिरी प्रस्तावितबुलडाणा तालुक्यातील ९६ गावांपैकी २५ गावांमध्ये यावर्षी विंधन विहिरी घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. अद्याप त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर पावले टाकली गेली नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. विंधन विहिरीसाठी यंदा तालुक्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये २२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठासध्या बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा, हनवतखेड, ढासाळवाडी, चौथा, देव्हारी, पिंपरखेड, सावळा, सुंदरखेड आणि भादोला या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरसाठीच यंदाच्या कृती आराखड्यात सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई