शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही ८ गावांना ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:14 IST

वर्तमान स्थितीत बुलडाणा तालुक्यातील सहा गावांना सहा टँकरद्वारे, चिखली तालुक्यातील एका गावाला आणि मोताळा तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा ...

वर्तमान स्थितीत बुलडाणा तालुक्यातील सहा गावांना सहा टँकरद्वारे, चिखली तालुक्यातील एका गावाला आणि मोताळा तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा तालुक्यात ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा, डोंगरखंडाळा, चौथा, सुंदरखेड या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या व्यतिरिक्त चिखली तालुक्यातील तांबुळवाडी-सैलानीनगरला आणि मोताला तालुक्यातील पोफळी गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना ८४ टंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

--६२ गावातील विहिरी अधिग्रहीत ग्रामीण भागातील ६२ गावांतही पाणीटंचाई असून त्यासाठी ६७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यावरून जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात येते. जिल्हयातीेल पाच तालुक्यांतील पावसाची सरासरी ही अद्यापही ५० टक्क्यांच्यावर सरकलेली नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता डिसेंबर आधीपासूनच जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.

--अनुदानही प्रलंबित--

गेल्या उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी जवळपास ७ कोटी ७० लाख ९९ हजार रुपयांचा खर्च झाला होता. हे अनुदानही अद्याप पाणीटंचाई विभागाला मिळालेले नाही. त्यातच पावसाळ्यातही काही गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचे चित्र आहे.