शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जलस्वराज्य’ दूर करणार शहरालगतची पाणीटंचाई!

By admin | Updated: June 19, 2017 04:30 IST

प्रकल्पास मान्यता; भादोल्यात राबवणार वाढीव दरडोई खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जागतिक बँक अर्थसहाय्यित जलस्वराज्य- २ कार्यक्रमांतर्गत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये भौतिक गुंतवणूक करण्यात येत आहे. या जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत बुलडाणा शहरालगतच्या भादोला येथे वाढीव दरडोई खर्च असलेली नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शहरालगतची पाणीटंचाई दूर होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांचे नियोजन, शहरालगतच्या, टंचाईग्रस्त व पाणी गुणवत्ताबाधित भागांमध्ये गुणवत्तापूर्ण व शाश्‍वत पाणीपुरवठा सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जलस्वराज्य-२ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत मुख्य भौतिक घटकांतर्गत शहरालगतच्या भागातील पाणीपुरवठा व स्वच्छता सुविधांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे गुणवत्तापूर्ण व नावीन्यपूर्ण पद्धतीने राबविण्यात येते. त्यासाठी जागतिक बँकेकडून ७0 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध होणार असून, राज्य शासनाकडून ३0 टक्के निधी देण्यात येणार आहे. पात्रता निकषांनुसार गाव निवड प्रक्रिया करणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यक्रम समन्वय समिती व शहरालगतच्या गावांमधील योजनांचे तांत्रिक पर्याय निवडण्यासाठी जिल्हा तांत्रिक समिती गठित करण्यात आली आहे. जलस्वराज्य-२ कार्यक्रमांतर्गत शहरालगतच्या भागातील सर्व पाणीपुरवठा व स्वच्छता योजनांची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत करण्यात येणार आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेला जलस्वराज्य-२ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम बुलडाणा जिल्ह्यातही पोहोचला आहे. जिल्ह्यातील बुलडाणा शहरालगत असलेल्या भादोला येथे वाढीव दरडोई खर्च असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता १७ जून रोजी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून देण्यात आली आहे.