शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठय़ांमधील पाणी आरक्षण जाहीर!

By admin | Updated: October 29, 2016 02:43 IST

नळगंगा प्रकल्पातील २.९५२ दलघमी पाणी आरक्षित.

बुलडाणा, दि. २८- जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे. त्याचप्रमाणे माघारी मॉन्सूननेसुद्धा दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नळगंगा प्रकल्प वगळता अन्य प्रकल्प तुडुंब भरले आहेत. या प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठय़ामधून बाष्पीभवन व अन्य व्यय वगळता उपलब्ध पाणीसाठय़ामधून रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्यासाठी पाणी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पाणी आरक्षण समितीने जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सदर आरक्षण घोषित केले आहे. या सभेला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. नेमाने, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनकुसरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात सर्व ठिकाणी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व इतर पिके घेण्यासाठी पाणी देण्यात यावे. पाणी वापर संस्थांच्या मागणीप्रमाणे पाण्याचे आरक्षण करावे. संस्था व नगर परिषद यांनी ३0 नोव्हेंबर २0१६ पूर्वी थकबाकी जमा करावी, अन्यथा पाणी पुरवठा बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. गरज नसताना बर्‍याच ग्रामपंचायती व नगर परिषदा पिण्याचे पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची मागणी करतात; मात्र प्रत्यक्षात पाणी वापर करीत नाही. त्यामुळे ओलितासाठी पाणी वापर होत नसून, हे पाणी बाष्पीभवन होऊन नष्ट होते.उपलब्ध पाणीसाठय़ानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी हंगामात जास्तीत जास्त पीक घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी केले.