शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
3
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
4
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
5
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
7
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
8
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
9
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
10
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
11
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
12
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
13
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
14
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
15
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
16
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
17
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
18
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
19
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
20
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी: जळगाव-नांदुरा वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 11:30 IST

Flood to Purna River : जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून, जळगाव जामोद नांदुरा वाहतूक बंद पडली आहे.

- जयदेव वानखडेजळगाव जामोद:      गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून, जळगाव जामोद नांदुरा वाहतूक बंद पडली आहे.  अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्या पूर्णा नदीला मिळत असल्याने या नदीला नेहमी मोठे पूर येतात. त्यातच गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण विदर्भात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या नदीला मोठा पूर आला असून जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क तुटला आहे. सध्या मानेगाव येथील पुलावरून 5 फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहनांचे वाहतूक ठप्प झाली आहे. तर आता बाहेर जायचे असल्यास मुक्ताई नगर मार्गे तसेच शेगाव मार्गे जाण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु हा मार्ग खूप फेऱ्या चा असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो. नवीन पुल केव्हा चालू होणार.     पूर्णा नदीच्या पात्रावर मानेगाव येथे नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतु पोच रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी जाते. तेव्हा मात्र वाहतूक बंद होऊन तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटून जातो. अशा परिस्थितीत नवीन पूल सुरू झाल्यास वाहतूक पूर्ववत राहून जिल्ह्याशी संपर्क राहतो. त्यामुळे सदर पुल तात्काळ सुरू करण्यात यावा. अशी मागणी जनतेमधून होत आहे.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीJalgaon Jamodजळगाव जामोद