शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेवर ‘लोटाधारीं’चे पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:25 IST

शहर हगणदरीमुक्तीचे स्वप्न भंगणार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका जंगजंग पछाडत असताना पालिकेच्या या प्रयत्नांवर ‘लोटाधारी’ पाणी फेरत असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले. यासंदर्भात ‘लोकमत’च्या चमूने मंगळवारी पाहणी केले असता बाळापूर फ ैल, चांदमारी, किसन नगर आदी भागातील मैदानेच नव्हे, तर पालिकेचे नवनिर्मित भाजी मार्केटही नागरिकांनी सोडलेले नसल्याचे दिसून आले. स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलेले आहे. या अभियानांतर्गत शहरे हगणदीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात खामगाव नगरपालिकेने सहभागी होत शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शासनाने ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा नागरिकांना कोणत्याही अटी न घालता शौचालय बांधकामाकरिता प्रत्येकी १८ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार खामगाव पालिकेने अनेक लाभार्थींना अनुदानसुद्धा उपलब्ध करून दिले; परंतु शासनाकडून अनुदान घेऊनही अनेक लाभार्थींनी शौचालयांचे बांधकाम केलेच नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे खामगाव शहर ‘हगणदरीमुक्त’ करण्याचा पालिकेचा प्रयत्न फोल ठरत असून, पालिकेच्या प्रयत्नांवर लोटा घेऊन बाहेर जाणाऱ्यांकडून पाणी फेरले जात आहे. उघड्यावर शौचास जाऊन घाण करणाऱ्या व सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा शासनाकडून मिळालेले आहेत. त्यानुसार पालिकेने अनुदान लाटूनही शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हे दाखल करविले आहेत, तसेच गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून लोटाधारींची वरात ही काढलेली आहे. एवढे करूनही लोटाधारी सुधरायला तयार नाहीत. अजूनही शहरातील विविध भागात अनेकजण रोज सकाळी लोटा घेऊन बाहेर जाताना दिसतात. या भागात करण्यात आली पाहणीस्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने खामगाव शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न नगर पालिकेकडून होत आहे; मात्र शहरातील बाळापूर फ ैल, शिवाजी नगर परिसर, नवाफैल, चांदमारी, धोबी खदान, शंकर नगर, किसन नगर आदी भागातील मैदानांवर पाहणी केली असता अनेक लोटाधारी उघड्यावर जात असून, संबंधित परिसर अद्याप हगणदरीमुक्त झालाच नसल्याचे दिसून आले. भाजी मार्केटची दुरवस्था कायमचशंकर नगर भागातील नवनिर्मित घरकुलांमधील भाजी मार्केटलाही हगणदरीचे स्वरूप आलेले असून, यासंदर्भात ‘लोकमत’ने याअगोदर स्टिंग आॅपरेशन केले होते. नव्याने बांधलेल्या भाजी मार्केटचा वापर लोक शौचालयासारखा करीत असल्याने या ठिकाणी प्रचंड घाण झालेली आहे; पण हा प्रकार उघडकीस आणूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे येथील हगणदरी अद्याप कायम आहे.