शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानाची मदत मिळण्याच्या 'आशेवर पाणी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 12:29 IST

Agriculture News, Buldhana Farmer पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये मूग, उडिदाचे पीक अज्ञात रोगाने हातचे गेले. काही प्रमाणात आलेले पीक अतिपावसामुळे मातीत गेले. तरीही त्यानंतर जिल्ह्यातील पिकांची पैसेवारी ६८ निश्चित झाल्याने आता त्या पीक नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका सर्वत्र उपस्थित होत आहे.चालू हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच मूग व उडिदाच्या पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे मूग व उडिदाच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहे. तसेच शेंगा काळ्या पडल्या. तसेच सप्टेंबरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सतत सुरू असल्यामुळे कपाशी व सोयाबिनचेही नुकसान झाले आहे. कपाशीची बोंडे गळून पडली आहेत. काही भागात कपाशीची पानेही गळून पडली आहे. या पावसामुळे घाटाखालील खामगाव तालुक्यात ३५७ हेक्टरवरीलसोयाबिन व कापूस पिकाचे १९ व २० सप्टेंबर रोजी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले तर शेगाव तालुक्यात ८७१ हेक्टरवरील कापूस, मका, ज्वारी व सोयाबिनचे नुकसान झाले. नांदुरा तालुक्यात ४०० हेक्टरवरील मका, उस, ज्वारी व कापसाचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात २५७३ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी व केळी पिकाचे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त पथकाने केले. त्यानंतर महसूल विभागाने जाहिर केलेल्या पैसेवारीमुळे त्या पीक नुकसानीची मदत मिळेल की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.प्रशासनाने जाहीर केल्यानुसार बुलडाणा तालुक्याची पैसेवारी ७४, चिखली-७१, देऊळगाव राजा-६८, मेहकर-७२, लोणार-६२, सिंदखेड राजा-६४, मलकापूर-६४, मोताळा-७१, नांदुरा-७१, खामगाव-६९, शेगाव-६५, जळगाव जामोद-६२, संग्रामपूर-७० या प्रमाणे नजर अंदाज जाहिर झाला आहे.

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती