शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सुकलेल्या झाडांना पालिकेचे ‘पाणी’; १३ कोटी वृक्ष लागवड योजना वांद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 18:27 IST

खामगाव :  शहराच्या विविध भागात लावलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखल्या जात नसल्याचे चित्र आहे. चक्क सुकलेल्या झाडांना ‘पाणी’ देत, वृक्ष जगविल्याचा खटाटोप सुरू असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

अनिल गवई। 

खामगाव :  शहराच्या विविध भागात लावलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखल्या जात नसल्याचे चित्र आहे. चक्क सुकलेल्या झाडांना ‘पाणी’ देत, वृक्ष जगविल्याचा खटाटोप सुरू असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

१३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत स्थानिक नगर पालिकेला ३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दीष्ठ ठरवून देण्यात आले. त्याअनुषंगाने खामगाव नगर पालिकेने  शहराच्या विविध भागात  वृक्ष लागवड, संगोपन आणि देखभालीसाठी कंत्राट देण्यात आला. या कंत्राटासाठी  १४ व्या वित्त आयोगातून विशेष तरतूद करण्यात आली. कंत्राटातील शर्ती व अटी नुसार एकुण लागवड उद्दीष्टाच्या ७० टक्के म्हणजेच २१०० वृक्षांच्या लागवडीचे बिल कंत्राटदाराला अदाही करण्यात आले. कंत्राटदाराने शहराच्या विविध भागात २८०० वृक्षांची लागवड केली. मात्र,  या वृक्षाची योग्य ती निगा न राखल्या जात नाही. त्यामुळे बहुतांश वृक्ष सुकली आहेत. या सुकलेल्या वृक्षांना देखील ‘पाणी’ घालत ही वृक्ष रोपटी जीवंत दाखवित देयक काढल्या जात आहे. पालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास ७० टक्के वृक्ष रोपट्यांचं देयक काढण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.

येथे झाली वृक्ष रोपट्यांची लागवड!

शहरातील डी.पी.रोड, स्वामी समर्थ नगर, गोकुल नगर, ओंकारेश्वर स्मशानभूमी, आदर्शनगर रोड परिसरात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वृक्ष रोपटे लावण्यात आले. ७० टक्के वृक्ष रोपट्यांच्या लागवडीचे देयकही अदा झाले. मात्र, यापैकी बहुतांश वृक्ष सुकली आहे. या सुकलेल्या वृक्षांनाही ‘पाणी’घालत, देयक काढण्यात येत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

 

‘घर-तेथे-झाड’ संकल्पना यशस्वी!

शहरात ‘घर-तेथे-झाड’ही संकल्पना नगर पालिका प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आली. या संकल्पनेतून दीड हजारावर वृक्ष रोपट्यांचे वितरण पालिकेकडून करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या योजनेला प्रतिसाद दिला. नागरिक आणि विविध शिक्षण संस्था स्वत: या वृक्षांची देखभाल करीत असल्याने, ‘घर-तेथे-झाड’ ही संकल्पना कमालिची यशस्वी ठरल्याचे दिसून येते.

 

 

शहराच्या विविध भागात एकुण उद्दीष्टापैकी ९० टक्के वृक्ष रोपट्यांची लागवड करण्यात आली.  सुकलेल्या वृक्षाबद्दल माहिती घेण्यात येईल. वृक्ष लागवड, संगोपन आणि वृक्ष रिप्लेसमेंट करून तीन वर्ष देखभालीचा कंत्राटात समावेश आहे. यातील अनेक वृक्षांची रिप्लेसमेंट करण्यात येत आहे. कंत्राटदाराला ७० टक्के वृक्ष लागवडीचे देयक अदा केले आहे.

- शंकर नेहारे, प्रभारी वृक्षाधिकारी, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा