शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘वॉटर कप’ स्पर्धा:  पोफळी-गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी एकटवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:47 IST

दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला.

-नविन मोदे

धामणगाव बढे : जलसंधारणासाठी देशभरात गाजलेली स्पर्धा म्हणजे सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा. या स्पर्धेला ८ एप्रिल रोजी राज्यभरात सुरूवात झाली. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या कायम झळा सोसणाºया पोफळी गावातील गावकºयांनी गाव पाणीदार करण्याचा निर्धार करीत ७ एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजता श्रमदानास प्रारंभ केला. मोताळा तालुक्यातील १३२ गावांचा दुष्काळा विरूद्ध सध्या संघर्ष सुरू आहे.४५ दिवस चालणाºया या स्पर्धेदरम्यान गावातील दुष्काळ हद्दपार करण्याचा निर्धार गावकºयांनी केला व ८ एप्रिलच्या पहिल्या सेकंदापासून श्रमदान प्रारंभ केले. त्यासाठी पोफळी येथील सुमारे ४०० अबालवृध्द, महिला, पुरूष व तरूणाई सहभागी झाली. गावकºयांच्या एकी व नेकीच्या बळावर कसा चमत्कार होवू शकतो हे सिंदखेड गावाने राज्यस्तरीय व्दितीय क्रमांकापर्यंत मजल मारत यापुर्वी सिध्द  केले आहे. आता असाच चमत्कार पोफळी येथे घडणार असून गावकºयांच्या भितीने व जिद्दीपुढे दुष्काळ वेशीवर आला आहे. पुढील ४५ दिवसात त्याला हद्दपार व्हावेच लागेल, असे यावेळी विस्तार अधिकारी दीपक माडीवाले यांनी सांगितले. गावकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी रात्री १२ वाजता हजर राहत त्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. पोफळी वासियांनी प्रशिक्षण, अभ्यासदौरे, आगपेटीमुक्त शिवार, माती परिक्षण, नर्सरी, पाणी बचत तंत्रज्ञान, प्रत्येक घराजवळ शोषखड्डे यासारखी पुर्वतयारी याअगोदरच पुर्ण केली. पोफळी येथे ७ एप्रिलच्या रात्री १२ वाजता औपचारिक उद्घाटनानंतर प्रत्यक्ष श्रमदानास गावकºयांनी प्रारंभ केला. दुष्काळाला कायमस्वरूपी हद्दपार करून गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यासाठी गावकरी, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग व तालुका प्रशासन एकवटले आहे. युवा उद्योजक नीलेश व्यवहारे, रावसाहेब देशमुख, दगडु सुरडकर यांचे मार्गदर्शनात काटेकोर नियोजन, युवकांचा प्रचंड प्रतिसाद, महिलांचा मोठा सहभाग आणि प्रशासनाची साथ यामुळे पोफळीमध्ये ‘तुफान आलया’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशन कामावर लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहे. गावातील उच्चशिक्षित तरूण राहुल व्यवहारे यांनी मागिलवर्षी अंबेजोगाई येथे पाणी फाऊंडेशनमध्ये काम केले. तेथील अनुभव देखिल गावकºयांना कामी येत आहे.  .मोताळा तालुक्यातील १३ गावांनी वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला असून तेथे प्रत्यक्ष श्रमदानात गावकरी सहभागी झाले आहे. त्यामध्ये पोफळी, सिंदखेड, लपाली, पान्हेरा, उºहा, खामखेड, उबाळखेड, जयपूर, कोथळी, राजूर, पुनई, शेलापूर या गावांचा समावेश आहे.  दुष्काळाविरूध्द गावकरी एकत्र आले. एकी व नेकीच्या बळावर गाव पाणीदार करण्याचा संकल्प गावकºयांनी केला आहे. त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होवू.- नीलेश व्यवहारेउद्योजक, पोफळी

 दुष्काळाविरूध्द गावकºयांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. गावकºयांच्या मदतीला प्रशासन सज्ज असून शक्य तेव्हा गावकºयांसोबत श्रमदानात सहभागी होवू.-दीपक माडीवालेविस्तार अधिकारी, पंचायत समिती, मोताळा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा