शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जळगाव जामोद तालुक्यात वॉटर कप स्पर्धेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 18:26 IST

जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला  गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे.

- जयदेव वानखडे जळगाव जामोद : तालुक्यात पाणी फौंडेशन द्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-2019 ला सुरुवात झाली आहे . 7 तारखेच्या मध्यरात्रीपासून या स्पर्धेला  गावागावातील जलयोद्धे आणि जलरागिनी यांच्या श्रमदानाने दमदार सुरुवात झाली आहे.बुलढाणा जिल्हा मधून  जळगाव जामोद  संग्रामपूर आणि मोताळा  या तीन तालुक्यांची  वॉटर कप स्पर्धेमध्ये  पुन्हा निवड झाली असून  या तालुक्यांमध्ये  श्रमदानाचे  तुफान येऊ लागले आहे.  जळगाव जामोद तालुक्यातील  बांडापिंपळ, सूनगाव, खेळलोण, जामोद, राजुरा,पळशी सुपो, काजेगाव, पळसखेड, निंबोरा बु., निंभोरा खु., वडगाव, पाटण, कुरणगाड खु., टाकळी खाती, आसलगाव इत्यादी गावांसह जवळपास तीस गावांनी  सात एप्रिल च्या मध्यरात्री श्रमदान केले. अगोदरच  स्पर्धेच्या  नादाने झपाटलेले हे लोक रात्री चे केव्हा १२ वाजतात आणि स्पधेर्ला केव्हा सुरुवात होते याची आतुरतेने वाट बघत होते. यापैकी बहुतांश गावातून लोकांनी हातात कुदळ फावडे टिकास घेऊन मशाल रॅली काढली तर,आदिवासी बांडा पिंपळ राजुरा भिंगारा इत्यादी गावात पारंपरिक पद्धतीने ढोल,ताशे वाजवून मिरवणूक काढण्यात आली.या दुष्काळ रुपी राक्षसाला कायमचा हद्दपार करण्यासाठी गावकºयांनी त्याच्यावर घणाघाती वार केले.सध्या राजकीय वातावरण तापले असल्यावर सुद्धा गावकरी यांचा उत्साह कमी न होता वाढतच आहे.लोकांचा प्रचंड प्रतिसाद बघता यंदा वॉटर कप स्पधेर्चे प्रथम बक्षीस  जळगाव जामोद तालुक्याला मिळेल आणि तालुका हा दुष्काळमुक्त होईल. असे एकंदरीत चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. मागील वर्षी अशाच पद्धतीने गाव पाणीदार करण्याच्या हेतूने गावातील लहान बालके मुले युवक महिला पुरुष वृद्धांपर्यंत सर्व एकत्र आले आणि गावागावात श्रमदान झाले त्याचेच लोन यावर्षी तालुक्यामध्ये पसरले असून यंदा तर संपूर्ण तालुका दुष्काळमुक्त करू अशा निश्चयाने वॉटर कप स्पर्धेतील गावे कामाला लागली आहेत.गेल्या दोन महिन्यापासून गावागावात सभा घेऊन वाटर कप स्पधेर्साठी गावातील लोकांना तयार करण्याचे काम तालुका समन्वयक जिल्हा समन्वयक तथा जल योद्ध्यांनी यांनी केले. त्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या गावातील तरुण तरुणी आदिवासी यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये स्वत:ला झोकून दिले आहे. मागील वर्षी वनविभागाच्या परिसरात काम करताना आलेली अडचण पाहता यावर्षी रीतसर जल व मृद संधारणाच्या कामा करिता वनविभागाची परवानगी घेऊन वॉटर कप स्पधेर्चा ची कामे सुरू झाली आहेत. एप्रिल चा महिना कडक उन्हाळा असूनही दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावागावात चमू तयार झाले असून भर उन्हात श्रम करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाJalgaon Jamodजळगाव जामोद