शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: September 7, 2014 00:26 IST

खामगाव येथे व्हॉल्व लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय

खामगाव : स्थानिक गजानन कॉलनी रोडवरील मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्याने ५ सप्टेंबर रोजी दिवसभर पाण्याचा अपव्यय झाला आहे. तर दुसरीकडे पाणी मिळण्यासाठी नागरिकांना मात्र वाट पाहावी लागते. खामगाव शहराची जवळपास ९५ हजारापर्यंत लोकसंख्या आहे. या नागरिकांना पाणीपुरवठय़ाची सोय नगर परिषदेने केली आहे. शहरातील पाणी पुरवठय़ाची वितरण व्यवस्था ही १00 वर्ष जुनीच असल्याने अनेक तांत्रिक अडचणी येतात. शहराला ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या १५ दिवसांअगोदर पावसामुळे पूर येऊन सारोळा गावाजवळ पाईपलाईन फुटली होती. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. नंतर नगर परिषदने युद्धपातळीवर प्रयत्न करून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. दोन-तीन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू असताना गजानन कॉलनी रोडवरील पत्रकार भवनाजवळ वामन नगर टाकीला जोडलेल्या मुख्य पाईपलाईनवरूनच व्हॉल लिकेज झाल्याने ५ सप्टेंबर रोजी दिवसभर या व्हॉलमधून पाण्याचे कारंजे उडून पाण्याचा अपव्यय झाला. यामुळे समोरच्या भागात पाणी पुरवठा प्रभावित झाला. वारंवार पाईपलाईनमध्ये लिकेज होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे पाण्याचा तर अपव्यय होत आहेच; मात्र यामुळे नागरीकांना वेळेवर पाणी मिळत नाही. या संदर्भात पाईपलाईनची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वारंवार होणारे असे प्रकार थांबावेत, अशी मागणी शहरवासीयाकडून होत आहे. दरम्यान नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय मोकासरे यांनी व्हॉल लिकेज असल्यास तत्काळ त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगीतले.