शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वान व पुर्णा या नद्याही कोरड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:35 IST

पातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्‍यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

ठळक मुद्देपिकांची वाढ खुंटली पेरणीनंतर दमदार पाऊसच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपातुर्डा : पातुडर्य़ात पेरण्यानंतर दमदार पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. दुसर्‍यांदा पेरूनही गेल्या आठवडाभर दमदार पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. भरपूर पावसाच्या लपंडावाने किटकांचा प्रादुर्भाव सुध्दा दिसून येत असून पिकांवर पाने कुरतडणारे किड्यांचे आक्रमण झाले आहे. शेतकर्‍यांना दमदार पावसाची आशा लागुन आहे. मात्र परिणामकारक पाऊस पडत नसल्याने यंदा शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे शेत शिवारातील चित्र आहे. जून महिन्यात १६0 मिमी तर जुलै महिन्यात केवळ ८0 मिमी पावसाची येथील पर्जन्यमापक यंत्राची नोंद आहे. अत्यल्प पावसात पिके कशीबशी तग धरून आहेत. अशातच कोरड्या वातावरणामुळे पिके वाढू शकली नाहीत. मुग व उडीद व सोयाबीन हे पिक सध्या फळधारणेवर आहे. ऐन याच वेळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी पिकांना पाणी देवून संगोपन करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

श्रावणाची झडी ची अपेक्षाच श्रावण महिना अत्यंत पावसाचा असतो यातील १0 दिवस निघून गेल्याने श्रावणाच्या श्रडीची यावर्षी प्रतीक्षाच बनुन राहिली. वान धरणाच्या पाणलोट क्षेत्रालाही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच पूर्णा ही सुध्दा परिसरातील मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. या नदीकाठी मोठा पूर गेला नाही व ऑगस्ट  महिन्यात पूर्णा नदी रौद्रय रूप धारण करते यावर्षी पूर्णा नदीला सुध्दा बेताचेच पाणी वाहिले.

पिक विमाबद्दल शेतकरी व्दिधा स्थितीतपरिसरात यावर्षी कमी पर्जन्यमान असून पिकांची परिस्थिती फारसी समाधानकारक नाही. असे असले तरीही पिक विम्याबद्दल शेतकरी व्दिधा मनस्थितीत आहे. गेल्या वर्षी शासनाने तूर पिकविण्याचे आवाहन केले . मात्र शासकीय खरेदी पाच हजार तर खाजगी व्यापार्‍यांकडे   केवळ तीन हजार रूपये भाव मिळाला तसेच सोयाबीनला सुध्दा कमी भाव मिळाला. पिकांना योग्य भाव न मिळाल्याने शासकीय आवाहनाबद्दल शेतकर्‍यांमध्ये अनास्था आहे. तसेच गेल्या वर्षी पिकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी पिक विमा काढण्याबद्दल व्दिधा स्थितीत आहेत. पिक विमा काढण्याची तारीख वाढली मात्र शासकीय धोरण निश्‍चित नसल्याने शेतकर्‍यांचा उत्साह मात्र वाढला नाही, असे चित्र आहे.