खामगाव : ट्रकच्या धडकेने संरक्षण भिंत अंगावर पडून इसम ठार झाला. ही घटना टेंभूर्णा शिवारात आज १८ मे रोजी घडली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर टेंभूर्णा शिवारात गणेश चौकशे यांच्या शेतात असलेल्या घरानजीक संरक्षण भिंत बांधलेली आहे. आज १८ मे रोजी दुपारी २ वाजेदरम्यान एम.एच.३0 एल ८३९ या क्रमांकाचा ट्रक निष्काळजीपणे चालवून रिव्हर्स घेत असताना संरक्षण भिंतीला ट्रकचालकाने धडक दिली. यामध्ये संरक्षक भिंतीमागे बसलेला दिलीप होळकर रा. पिंप्री गव्हाण याचे अंगावर संरक्षक भिंत पडल्यामुळे त्याच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रत्नाकर मधुकर जोशी वय ५४ मॅनेजर गणेश एजन्सी खामगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी ट्रक चालक संतोष ताथोड रा.जयपूर लांडे याचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकच्या धडकेने भिंत कोसळून इसम ठार
By admin | Updated: May 19, 2014 00:45 IST