शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाऊले चालती... स्वच्छतेची वाट!

By admin | Updated: July 17, 2017 02:04 IST

एक दशकपासून ‘तरुणाई’ची स्वच्छता वारी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा वसा जोपासण्याचा अनोखा प्रयत्न खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून केल्या जात आहे. स्वच्छता वारीच्या या उपक्रमाची आता विविध सामाजिक संस्थांकडूनही दखल घेतल्या जात आहे.संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगाव शहरात आगमन होत असून, मंगळवारी ही पालखी शेगाव येथे जाणार आहे. या पालखीदरम्यान, वारकऱ्यांना अन्नदान, आणि फराळाचे साहित्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, यासाठी प्लास्टिक आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याने, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचायचा. हा कचरा साफ करण्यासाठी खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने सर्वप्रथम सन २००६ साली सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावरील केळीच्या साली, प्लास्टिक द्रोण, पत्रवाळ्यांचा कचरा तरुणाईने साफ करण्यासाठी स्वच्छता वारी सुरू केली. या स्वच्छता वारीला येत्या मंगळवारी दहा वर्ष पूर्ण होणार असून, संत गजानन विजय गं्रथातील पहिल्या अध्यायातील ‘ शीत पडल्या दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालित। हें करण्याचा हाच हेतू ।‘अन्न परब्रम्ह’ कळवायाया’ या ओवीतून संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व जाणा, असा संदेश दिला आहे.हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तसेच दिंडी मार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाईचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. सामाजिक संस्थांकडूनही दखल!तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून १६ किमी मार्गावरील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येते. या उपक्रमामुळे स्वच्छ अभियानाला हातभार लागणार असून, या उपक्रमात मलकापूरचे संत गाडगेबाबा विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव, बोथा फॉरेस्ट तरुणाई, आर्ट आॅफ लिव्हिंग, हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघ, एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय, सामाजिक वनीकरण विभाग यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी या उपक्रमापासून प्रेरणा घेतली आहे. दिंडी मार्गावरील कचरा निर्मूलनासह, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात इतर संस्थांचेही सहकार्य लाभते.- नारायण पिठोरेअध्यक्ष, तरुणाई फाउंडेशन, खामगाव.