शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

ज्ञानगंगात स्थिरावलेल्या  ‘वॉकर’ वाघाचा शोध लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 12:11 IST

The ‘walker’ tiger settled in Gyanganga was not found : वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या दीड वर्षापूर्वी ज्ञानगंगा अभयारण्यात दाखल झालेल्या ‘टी१सी१’ वाघ अर्थात ‘वॉकर’ सध्या अभयारण्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रसंगी तो अंबाबरवा किंवा अजिंठा पर्वत रांगांमध्ये गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागही त्याचा शोध घेत असून तशा सूचनाही अंतर्गत पातळीवर दिल्या असल्याची माहिती आहे.मेळघाटातून बोरीवलीतील अभयारण्यात गेलेल्या एका बिबट्याच्या नंतर सर्वाधिक भटकंती केलेला वाघ म्हणून ‘टी१सी१’कडे पाहिले जात होते. लॉग टर्म मॉनिटरिंग ऑफ टायगरर्स उपक्रमांतर्गत वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र वन विभागाच्या अर्थसाहाय्यातून वाघांचा करण्यात येणाऱ्या अभ्यासांतर्गत ‘वॉकर’वर नजर ठेवल्या जात होती. ज्ञानगंगा अभयारण्यात तो बराच काळ स्थिरावला होता. त्याच्या वास्तव्यामुळे ‘ज्ञानगंगा’चे भाग्यही उजळले होते.मात्र जवळपास गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये या वाघाचे दर्शन झालेले नाही. त्यामुळे अभयारण्य सोडून हा ‘वॉकर’ अन्यत्र तर गेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाही म्हणायला या वॉकरच्या गळ्यात रेडिओ कॉलर आयडीही लावलेली होती. त्याची बॅटरी डाऊन झाल्याने नंतर ती काढून घेण्यात आली होती. त्यामुळे त्याचे निश्चित ठिकाण वनविभागालाही शोधणे कठीण झाले आहे. याबाबत वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता प्रसंगी ‘वॉकर’ अंबाबरवा अभयारण्य किंवा जळगाव खान्देशमधील भवानी अभयारण्य किंवा अजिंठा पर्वत रागांमध्ये गेला असल्याचा कयास नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त करण्यात आला.

वाघाच्या मेटिंगसाठीही प्रयत्नअगदी खासदार प्रतापराव जाधव यांनी वयात आलेल्या या वाघाला मेटिंगसाठी ज्ञानगंगात वाघीण सोडण्याचीही मागणी केली होती. पत्रव्यवहाराचा सोपस्कारही पार पडला होता. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटनेही त्यास सहमती दर्शवली होती. त्यासाठीची बैठक कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षी पुढे ढकलावी लागली होती. आता तर वॉकरचा शोध घेण्याची वेळ आली आहे.  त्यातच वर्षातून दोनदा होणाऱ्या व्याघ्र संवर्धनाच्या बैठकांचेही काय झाले, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. साधारणत: सहा महिन्यातून किमान एक बैठक होणे अपेक्षित असते.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यTigerवाघbuldhanaबुलडाणा