शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या पत्नीची शेगावात आत्महत्या

By admin | Updated: July 13, 2017 00:38 IST

छळवणुकीचा आरोप : आरोपींच्या अटकेसाठी प्रेत उचलण्यास नकार!

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : येथील एका वकिलाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, सासरच्या छळामुळे विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत, आरोपींना अटक होईपर्यंत विवाहितेचे प्रेत हलविण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव रोकडियानगर भागातील अ‍ॅड. अनिल सुखदेव वाकोडे यांच्या पत्नी सुजाता वाकोडे (वय ३५) यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी विवाहितेचे वडील बाळकृष्ण दारोकार रा. अटकळी ता. तेल्हारा, जि. अकोला यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले, की आपल्या मुलीचा सासरकडून पैसे आणण्यासाठी नेहमीच छळ सुरू होता. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर सासरच्या मंडळीनी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. सासरच्या मंडळीच्या सततच्या तगाद्याला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस पती अ‍ॅड. अनिल वाकोडेसह सासरा सुखदेव वाकोडे, सासू मैनाबाई, दीर अ‍ॅड. प्रकाश वाकोडे आणि नणंद अनिता कारणीभूत असल्याचे नमूद केले. आरोपींविरोधात कलम ३०६, ४९८ -अ ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेच्या मागणीसाठी सात तास प्रेत पडून आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून, तिचा खून केला असल्याने पती व नातेवाईक फरार झाले आहेत. त्यांना अटक होईपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा हट्ट मृतकाच्या नातेवाईकांनी करीत आक्रोश केला. यामुळे रोकडियानगर परिसरात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. ठाणेदार हूड यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर सात तासांनी सायंकाळी प्रेत शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. सध्या सर्व आरोपी फरार आहेत.