शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांना गतवर्षीच्या पीक विम्याची प्रतीक्षा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 01:11 IST

बुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. 

ठळक मुद्देबँकांमध्ये चकराधनादेश देण्यास होत आहे विलंब  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. शासनाच्यावतीने पीक विमा काढण्याचे शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा काढतात. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी १७ कोटी ९७ लाख रुपये पीक विम्यासाठी मंजूर झाले आहेत. यामध्ये ३२ हजार ३६५ शेतकर्‍यांचा समावेश आहे. ही रक्कम आज मिळेल उद्या मिळेल, या आशेने शेतकरी  असलेल्या बँकेमध्ये चकरा मारत आहेत; मात्र त्यांच्या नशिबी उपेक्षाच येत आहे. विम्याच्या रकमेतून पीक कर्जाचा भरना करून कर्ज पुनर्गठनासाठी ही रक्कम उपयोगी पडली नाही. शेतीच्या रब्बीच्या हंगामातील पिकासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी सन २0१५- १६ चा रब्बी हंगामाची गहू, हरभरा, करडई आदी पिकाचा पीक विमा हप्ता भरलेला होता; मात्र कमी पावसाअभावी पिके करपली. हरभरा पिकांचे बियाण्यांचा खर्चदेखील वसूल झाला नाही. अशा परिस्थितीत रब्बी पीक विम्याचा शेतकर्‍यांना आधार होता; मात्र अजूनही शेतकर्‍यांना विमा मिळाला नाही. शेतकरी अजूनही पीक विम्याच्या आशा धरून बसले आहेत. या कुंभकर्णी झोपेतील शासनाला अद्यापही जाग येत नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विमा कंपनीने सर्वच महसूल विभागाचा पीक विमा मंजूर केला होता. गह,ू हरभरा आदी पिकाच्या नुकसानीच्या हेक्टरी  रक्कम पाठवून दोन महिने झाले होते; पण शासनाच्या लालफितीत या विमा  नुकसान भरपाईची रक्कम बळीराजाच्या खात्यावर जमा झाली नाही.