शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

किडनी निकामी झालेल्या मुलीला मदतीची ‘प्रतीक्षा’

By admin | Updated: July 12, 2014 00:16 IST

खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील चौदा वर्षीय प्रतीक्षाला मदतीची ‘प्रतीक्षा’

खामगाव : किडनीचा आजार जडलेल्या चौदा वर्षीय प्रतीक्षाला आपला आजार कधी बरा होईल, असा यक्ष प्रश्न पडला आहे. किडनीच्या आजाराचा ती धैर्याने सामना करीत आहे, तरी वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती तिच्या उपचाराच्या आड येत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा की प्रतीक्षावर उपचार करावा, अशा द्विधा मनस्थितीत ते गुंतले आहेत.खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील संतोष चिंधकाजी कळसकार हे महसूल विभागांतर्गत तलाठी कार्यालय, अंत्रज येथे कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महिन्याकाठी जेमतेम पाच हजार रुपये वेतन मिळते. अशाही परिस्थितीत आपल्या पाच सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा ओढत अस तानाच अचानक त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. त्यांच्या तीन पैकी एका मुलीला वर्षभरापूर्वी किडनीचा दुर्धर आजार जडला. डॉक्टरांनी किडनीचे प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला दिला आहे. त्याकरिता चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दानदात्यांनी प्रतीक्षाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. **आजारावर खर्च होतात महिना चार हजारअनुसूचित जाती-जमाती मागासवर्गीय मुलींची निवासी शाळा, घाटपुरी येथे राहून शिक्षण घेत होती; मात्र आजाराचा त्रास असह्य होत असल्याने इयत्ता नववीसाठी तिला गावातील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात टाकण्यात आले आहे. तिची आई शोभाबाई घरकाम सांभाळून शेतीत मोलमजुरी करता त. यातून मिळणारी रक्कमही त्यांच्या परीने त्या प्रतीक्षाच्या उपचारावर खर्च करतात. तिच्यावर तत्काळ लक्ष देता यावे म्हणूनच तिला गावातील शाळेत टाकण्यात आले आहे.