शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 10:18 IST

Khamgaon News : तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना बँका नोटिसा पाठवत असल्याने तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.युती शासनाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. यामुळे या योजनेतून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. तर दुसरीकडे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता. यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश होता. शेतकरी कर्जमुक्त व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेतील प्रत्यक्ष नियम आणि अटींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजा कायम राहून पुन्हा कर्ज मिळण्यास अडचणी येत होत्या.गेल्या दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती. यातून जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले. याच दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान आणि दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँक, मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढत आहेत. यंदा कोरोनामुळे शेतमाल विक्रीत अडचणी आल्याने शेतकरी संकटात आहेत. यामुळे शासनाने केलेल्या दोन्ही घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी