शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कापूस विक्रीची प्रतीक्षा

By admin | Updated: October 17, 2016 02:33 IST

बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर कापूस पेरणी

बुलडाणा, दि. १६- अवकाळी पावसामुळे यंदा सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला, तर यातून बचावलेल कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष कापूस विक्रीतून नफा मिळविण्याकडे लागले आहे; मात्र दसरा झाल्यानंतर अद्यापही कापूस खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टवरवर खरिपाची पेरणी करण्यात आली. यात १ लाख ४७ हजार ५७ हेक्टरवर कापशीची पेरणी करण्यात आली. यात घटाखाली मोताळा, नांदुरा, शेगाव, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि बुलडाणा या तालुक्यांमध्ये कपशीचे क्षेत्र जास्त आहे. गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र यंदा मान्सून वेळेवर पडल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना झाला. त्यामुळे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला. दरवर्षी कपाशी खरेदीला दसर्‍यानंतर प्रारंभ होतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात दिवाळी सणादरम्यान पैसा खेळता असतो; मात्र यंदा दसरा सण झाल्यानंतरही अद्यापही जिल्ह्यात शासनाकडून कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. परिणामी ग्रामीण भागात खासगी स्वरूपात कमी भावात शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी केली जात आहे.राज्यात कापूस खरेदीची संमती मिळावी, यासाठी सीसीआयने राज्य शासनाकडून परवानगी मागितली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सीसीआयकडून कापूस खरेदी केली जाणार, अशी आशा शेतकर्‍यांना लागली आहे. दोन लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यताराज्यात ३९ हेक्टरवर कपाशीची पेरणी करण्यात आली. यामुळे राज्यात किमान ७0 ते ७५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कपाशी क्षेत्र १ लाख ४७ हजार ५७ हेक्टर आहे. यंदा पडलेल्या समाधानकारक पावसाचा लाभ कपाशी उत्पादकांना मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशी उत्पादनात वाढ होऊन २ लाख गाठीपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.