शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेसाठी करावी लागते वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान जमा करा सिंदखेड राजा : कोरोनाच्या पार्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने निराधार गोरगरिबांना आर्थिक टंचाईचा सामना ...

निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान जमा करा

सिंदखेड राजा : कोरोनाच्या पार्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने निराधार गोरगरिबांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. अंध, अपंग, विधवा, श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

काेरोना टेस्टसाठी किटचा अभाव

बुलडाणा : कोरोना टेस्ट वाढल्यामुळे तपासणी केंद्रामध्ये किट कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांना केंद्रामधून परत पाठविण्यात येत आहे. बुलडाण्यातील बहुतांश केंद्रामध्ये हीच परिस्थती असल्याचे दिसून येते.

सरस्वती, अजीसपूर येथे पॉझिटिव्ह

लोणार : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या आता वाढत आहे. १९ एप्रिल रोजी तालुक्यातील सरस्वती येथे दोन व अजीसपूर येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

बुलडाण्याला ४५ ऑक्सिजन सिलिंडर

बुलडाणा: शहरात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, १९ एप्रिल रोजी बुलडाण्यासाठी ४५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले आहेत. वाढती कोरोना पॉझिटिव्हची रुग्णसंख्या बघता ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.

संचारबंदीमुळे ऊस पिकाचे नुकसान

बीबी : संचारबंदीमुळे ऊस पिकाचे नुकसान होत आहे. साखर कारखान्याला ऊस देता येत नाही. ऊसतोडणी मजूर सुद्धा मिळत नाही. रसवंतीही बंद झाल्याने त्या व्यावसायिकांनी करार सोडून दिले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संचारबंदीमुळे कामे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यावेळी विविध संघटना पुढाकार घेत आहेत. मात्र, सामाजिक कार्याचे हे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमीच आहे.

अंगणवाडी कर्मचारी संकटात

सुलतानपूर : कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. या कर्मचाऱ्यांना अग्रक्रमाने मानधन देण्याबाबत शासनाने आदेश देण्याची गरज आहे.

खासगी शाळांचे पेपर ऑनलाइन

बुलडाणा: काही खासगी शाळांकडून ‘टेस्ट पेपर’ सुद्धा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी काय वाचले, काय लिहिले, गणित कसे सोडविले याची तपासणी संबंधित शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

रात्रीच्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

बुलडाणा : कोरोनाच्या भीतीने जिल्ह्यातील अनेक गावांमधील नागरिक शेतात राहायला गेले आहेत. मात्र कृषिपंपासाठी रात्रीचे भारनियमन असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. भारनियमन बंद करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

फळ प्रक्रिया उद्योगांचा अभाव!

सिंदखेडराजा : फळ उत्पादक शेतकऱ्यांची सिंदखेडराजा तालुक्यात संख्या लक्षणीय आहे. ते शेती, बाग यातच ते गुरफटलेले असतात. यावर्षी ५० हून अधिक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची लागवड केली आहे, परंतु बाजारपेठ उपलब्ध नसल्याने बागायतदारांना स्वत: च फळे विकावी लागत आहेत. शेतकरीच व्यापारी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टेलरिंग व्यवसायाची अवकळा

हिवरा आश्रम : ग्रामीण भागात शिलाई मशीन व्यवसायाला कोरोनाचा फटका बसला आहे. लग्नसराई थांबल्याने टेलरिंग व्यवसायावर अवकळा पसरली आहे. ग्रामीण भागात सरासरी नागरिक कपडे शिवून घालतात. लग्नसराईच्या दिवसात टेलरिंग व्यावसायिकांची चंगळ असते.