शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:32 IST

बुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७  सरपंच  पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख  ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत.

ठळक मुद्दे३ लाख ६२ हजार ६८६ मतदार १,५४२ ग्रमपंचायत सदस्यांसाठी प्रत्यक्ष मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७  ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७  सरपंच  पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख  ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत.ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंदु समजल्या जाणार्‍या  ग्रामपंचायत निवडणुकांची अखेर वेळ आली आहे. जिल्ह्यातील  २७९ ग्रामपंचायतींची निवडणूक ७ ऑक्टोबर रोजी होत असून,  यावर्षी पहिल्यांदाच सरपंच पद थेट जनतेतून निवडण्यात येणार  असल्याने सरपंच पदासाठी स्वतंत्र अर्ज भरण्यात आले आहेत.  ग्रामपंचायत सदस्य पदासाठीसुद्धा स्वतंत्र ऑनलाइन अर्ज  भरण्यात आले आहेत. जिल्ह्यात होणार्‍या ग्रामपंचायत  निवडणुकामध्ये एकूण ग्रामपंचायत सदस्य १ हजार ५४२   असून, २५७ सरपंच पदासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत  आहे. यामध्ये  बुलडाणा तालुक्यात १२ ग्रामपंचायतमधून ८६  ग्रामपंचायत सदस्य व ११ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  चिखली तालुक्यात २८ ग्रामपंचायती १४0 ग्रामपंचायत सदस्य व  २६ सरपंच पदासाठी मतदान होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात  ३0 ग्रामपंचायतमधून १४0 ग्रामपंचायत सदस्य व २९ सरपंच  पदासाठी मतदान होत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात १९  ग्रामपंचायतींमधून ९५ ग्रामपंचायत सदस्य व १७ सरपंच  पदासाठी मतदान होत आहे. मेहकर तालुक्यात ५0 ग्रामपंचाय तींमधून २६६ ग्रामपंचायत सदस्य व ४४ सरपंच पदासाठी म तदान होत आहे. लोणार तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींमधून २७२  ग्रामपंचायत सदस्य व ३६ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  मलकापूर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींमधून ६७ ग्रामपंचायत  सदस्य व १0 सरपंच पदासाठी मतदान होत आहे. मोताळा तालु क्यात ११ ग्रामपंचायतींमधून ८९ ग्रामपंचायत सदस्य व ११ सर पंच पदासाठी मतदान होत आहे. नांदुरा तालुक्यात १३ ग्राम पंचायतींमधून ७६ ग्रामपंचायत सदस्य व १२ सरपंच पदासाठी म तदान होत आहे. खामगाव तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधून ७१  ग्रामपंचायत सदस्य व १५ सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  शेगाव तालुक्यात १0 ग्रामपंचायतींमधून ४४ ग्रामपंचायत सदस्य  व १0 सरपंच पदासाठी मतदान होत आहे.  जळगाव जामोद  तालुक्यात १९ ग्रामपंचायतींमधून ६२ ग्रामपंचायत सदस्य व १८  सरपंच पदासाठी मतदान होत आहे. संग्रामपूर तालुक्यात २१ ग्रामपंचायतींमधून ८५ ग्रामपंचायत  सदस्य व १८ सरपंच पदासाठी मतदान होत आहे. ग्रामपंचायत  निवडणुकीमध्ये एकूण ३ लाख ६२ हजार ६८६ मतदारांचा  समावेश आहे.

मतदारांना मिळणार पगारी सुटीजिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतच्या ७ ऑक्टोबर रोजी  निवडणुका होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक  असलेल्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी  आपल्या कामाच्या ठिकाणावरून पगारी सुटी देण्यात येणार  आहे. तसेच मतदारांना योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न  झाल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्यास तशी तक्रारही  निवडणूक विभागाकडे मतदाराने केली तर संबंधितांवर  कार्यवाहीसुद्धा होऊ शकते.

५३ जागेवर एकही नामनिर्देशन नाही जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी एकही नामनिर्देशन  पत्र प्राप्त झालेले नाही अशा एकूण ५३ जागांचा समावेश आहे.  त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात १, चिखली तालुक्यात ९,  देऊळगाव राजा तालुक्यात २, मेहकर तालुक्यात १४, मलकापूर  तालुक्यात २,  नांदुरा तालुक्यात २, खामगाव तालुक्यात ७,  शेगाव तालुक्यात ३, जळगाव जामोद तालुक्यात ९, संग्रामपूर  तालुक्यात ४  ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी एकही नामनिर्देशन  पत्र प्राप्त झालेले नाही.