शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मतदारांना धमक्या; उमेदवारांची तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:30 IST

नांदुरा : तालुक्यातील तरवाडी गट ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार मिनाबाई रमेश भाकरे यांनी विरोधक मतदारांना आमिषे दाखवित असल्याची तथा धमकावित असल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी नांदुरा यांच्याकडे दाखल केली आहे. 

ठळक मुद्देतरवाडी येथील वातावरण तणावपूर्णग्राम पंचायत निवडणूक

नांदुरा : तालुक्यातील तरवाडी गट ग्राम पंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार मिनाबाई रमेश भाकरे यांनी विरोधक मतदारांना आमिषे दाखवित असल्याची तथा धमकावित असल्याची तक्रार तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी नांदुरा यांच्याकडे दाखल केली आहे. तरवाडी गट ग्राम पंचायत अंतर्गत तरवाडी, पोटा, मोरवंड व कंडारी चार गावे येतात. येथील सरपंचपद नामाप्र स्त्री राखीव असून, येथे सरपंच पदासाठी ज्योती ओमराज कुटे, यमुना संतोष तायडे, विद्या गोपाळ तायडे, मिनाबाई रमेश भाकरे या चार महिला उमेदवार आहेत. यापैकी मिनाबाई रमेश भाकरे यांनी तहसीलदार  तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे एक तक्रार अर्जान्वये गावात विरोधक मतदारांना धमकावित असल्याबाबत कळविले आहे. विरोधकांमुळे गावामध्ये दहशत निर्माण होत असून, निर्भयपणे मतदान होण्याची शक्यता नसून मतदार मतदानापासून दूर राहू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली आहे. तसेच तरवाडी ग्राम पंचायत बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असून, येथील काही पोलिसांसोबत गावातील विरोधक मिळालेले असून, निवडणुकीदरम्यान तरवाडी येथे बोराखेडी व्यतिरिक्त इतर पोलीस स्टेशन कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमावे, अशी मागणीही सदर तक्रारीत करण्यात आली आहे.