शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मानवी संवेदना दृढ करण्यासाठी विवेकानंद विचार साहित्य संमेलन - गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:49 IST

मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. 

ठळक मुद्देस्वामिजींच्या एकात्मतेचा विचार समाजाच्या नसानसात भिनविणार!

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम:  स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त हिवरा आश्रम येथे आयोजित विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे विचार संमेलन राहणार आहे. विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांना नवसमाज निर्मितीसाठी, राष्ट्र उभारणीसाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कसे प्रसारित करता येईल, हा उद्देश या संमेलनातून साधणे अपेक्षित आहे. मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. सहा ते ८ जानेवारीदरम्यान होत असलेल्या स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच्या पृष्ठभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांची उपस्थिती होती.  गोरे म्हणाले की, निष्काम कर्मयोगी शुकदास महाराज या विरक्त संन्याशाने मानवसेवेसाठी विवेकानंदांच्या विचारांची अगदी गावकुसातून पेरणी केली. आयुष्यभर त्या विचारांचे जागरण केले. 

आगळे-वेगळे संमेलनविवेकानंद विचार साहित्य संमेलन हे आगळे-वेगळे आहे. निव्वळ औपचारिकतेच्या परंपरेला फाटा देणारे हे संमेलन असून, त्यात अध्यक्षपदासाठी घोडेबाजार नसेल. संमेलनस्थळावरून वादही नसेल. पंचतारांकित व्यवस्थेसाठी सारस्वतांची एकमेकांवर चिखलफेकही नसेल. संमेलनाच्या पवित्र व्यासपीठावर राजकीय पुढार्‍यांचा वावरही नसेल, असे गोरे म्हणाले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा