शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद जयंती महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:30 IST

हिवरा आश्रम(बुलडाणा) : विवेकानंद जयंती महोत्सव २ फेब्रुवारीपासून आश्रमात प्रारंभ हाेत आहे. महापंगत, स्वामीजींच्या प्रतिमेची मिरवणूक व यात्रा ...

हिवरा आश्रम(बुलडाणा) : विवेकानंद जयंती महोत्सव २ फेब्रुवारीपासून आश्रमात प्रारंभ हाेत आहे. महापंगत, स्वामीजींच्या प्रतिमेची मिरवणूक व यात्रा हे अत्यंत महत्त्वाचे व देखणे सोहळे या उत्सवातून रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाच्या परवानगीनुसार केवळ व्यासपीठावरील कार्याक्रमांनाच ऑनलाइन प्रक्षेपणाद्वारे सादर करण्याची मान्यता मिळाली आहे.

संस्कृतचे अभ्यासक व चिंतनकार निवृत्तीनाथ येवले शास्त्री व थुट्टे शास्त्री यांच्या गीता चिंतनाने मंगळवारी महाेत्सवास सुरुवात हाेणार आहे. विवेकानंद आश्रमाचा गायकवृंद व औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक प्रा. गजानन केचे यांचे अनुभूती गायन, श्रीरंग महाराज वाहेगावकर यांचे प्रवचन, शिवचरित्रकार गजाननदादा शास्त्री महाराज यांचे व्याख्यान, दुपारी विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे विश्‍वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांचे हरिकीर्तन, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे व डॉ. चारूदत्त आफळे पुणे यांचे व्याख्यान तर शेवटी वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांचे हरिकीर्तनाने दिवसभराच्या कार्यक्रमांचा समारोप हाेणार आहे. विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यात होणारी ही मोठी वैचारिक चळवळ असून, शुकदास महाराजांनी सुरू केलेला हा वारसा समाजाचे वैचारिक भरण पोषणासाठी व सुज्ञ समाज निर्माण होण्यासाठी निश्‍चितच फलदायी ठरणार आहे.

घरुनच महाेत्सवात सहभागी हाेण्याचे आवाहन

विवेकानंद आश्रम आज ५० विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत आहे. आश्रमाचे व्यक्तिमत्त्व सर्वसामान्यांना आपली वाटणारी व जनकल्याणासाठी आपल्या सर्वशक्तीचा वापर करणारी संस्था असे असून, वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक संकटांना समाजासोबतच शासन, प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारी धर्मादाय संस्था आहे. यावर्षीच्या उत्सावात आपण सामिल न होता घरीच राहून या सर्व कार्यक्रमांचा लाभ माध्यमांद्वारे घ्यावा, असे आवाहनही विवेकानंद आश्रमाद्वारे करण्यात आले आहे.